नवी मुंबई - दहावीच्या परीक्षेमध्ये यश मिळविणाऱ्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रत्येक पालिकेच्या शाळेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला ४० हजार व प्रत्येक शाळेत पहिला क्रमांक मिळविणा-या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांची मदत केली आहे.नवी मुंबईमध्ये खासगी शाळांमधील फी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे माध्यमिक शिक्षण घेणे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना अवघड होवू लागले होते. खासगी शिक्षण संस्थांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महापालिकेने १७ माध्यमिक शाळा सुरू केल्या आहेत. या शाळेमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून विद्यार्थी चांगले यश मिळवू लागले आहेत. दहावीच्या परीक्षेमध्ये यश मिळविणाºया विद्यार्थ्यांचा शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर, स्थायी समिती सदस्य शिवराम पाटील यांनी महापालिका मुख्यालयामध्ये सत्कार केला. मनपा शाळेतील ४ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. १५ विद्यार्थ्यांनी ८५ पेक्षा जास्त, १२ विद्यार्थ्यांनी ८० ते ८५ दरम्यान गुण मिळविले आहेत. वैष्णव गंगाराम कोंडाळकर या विद्यार्थ्याने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून त्याला शिवसेनेच्यावतीने ४० हजार रुपये मदत देण्यात आली आहे. १७ शाळांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाºया विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये मदत देण्यात आली आहे.महापालिका मुख्यालयामध्ये शिक्षण अधिकारी संदीप संगवे यांच्या दालनामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करून पुढील शिक्षणासाठी मदत करण्यात आली.- किशोर पाटकर, नगरसेवक, शिवसेना
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शिवसेनेची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 4:46 AM