वीज वितरणचा ग्राहकांना झटका

By admin | Published: July 3, 2017 06:43 AM2017-07-03T06:43:28+5:302017-07-03T06:43:28+5:30

वीज वितरण कंपनीकडून शहरातील ग्राहकांना बिलाच्या माध्यमातून झटका बसत आहे. २०० ते ५०० रुपयांपर्यंत साधारण महिना

Shock the customers of the power distribution | वीज वितरणचा ग्राहकांना झटका

वीज वितरणचा ग्राहकांना झटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वीज वितरण कंपनीकडून शहरातील ग्राहकांना बिलाच्या माध्यमातून झटका बसत आहे. २०० ते ५०० रुपयांपर्यंत साधारण महिना बिल असणाऱ्या ग्राहकांना तीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंतचे बिल येऊ लागले आहे. यामुळे वीज वितरणविषयी नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण होऊ लागली आहे.
वीज वितरणच्या ढिसाळ कारभाराचे शहरात सर्वच विभागांमध्ये दर्शन घडत आहे. उघड्या विद्युत डीपी, उघड्यावर पडलेल्या भूमिगत विद्युत वायरी यामुळे अनेकांचे प्राण जात आहेत. यासंबंधीच्या अनेकदा तक्रारी करूनही वीज वितरणकडून त्यात सुधार झाल्याचे दिसत नाही. यामुळे वितरणच्या कामचुकार पद्धतीवर नागरिकांची नाराजी असतानाच ग्राहकांना बिलाच्या माध्यमातून झटका बसू लागला आहे. उन्हाळ्याचा संपूर्ण कालावधी विजेच्या लपंडावामध्ये गेल्यानंतरही ग्राहकांना बिल मात्र दुप्पट येऊ लागले आहे. यासंदर्भात काहींनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून चौकशीही केली; परंतु काहींना उडवाउडवीची उत्तरे मिळाली, तर काहींना रीडिंग दरम्यान नोंद झालेल्या जादा युनिटनुसार बिलाची आकारणी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, रीडिंग घेणारे कंत्राटदार व वीज वितरण अधिकारी यांच्या संगनमताने ग्राहकांची लूट होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
रीडिंग घेण्याची ठरावीक मुदत नसल्याचा भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. प्रत्येक महिन्याच्या ठरावीक तारखेलाच रीडिंग घेतल्यास, त्या कालावधीत झालेल्या नेमक्या युनिटचा वापर नोंदीवर येऊ शकतो. प्रत्यक्षात मात्र वितरणकडून तसे होताना दिसत नाही. यामुळे शहरातील शेकडो वीज ग्राहकांना मागील दोन महिन्यांत दुपटीने बिल प्राप्त झाले आहे. अशाच प्रकाराने घणसोलीतील काही ग्राहक वीजबिलाच्या रकमेनेच होरपळले आहेत. महिना उलटून गेल्यानंतर काहीशा उशिराने ग्राहकांच्या मीटरची रीडिंग घेतली जात असल्याचा आरोप घणसोलीतील रहिवासी भरत चव्हाण व अर्जुन कोडीतकर यांनी केला आहे. तर जादा युनिट मोजले गेल्याने युनिट वापराचा एक टप्पा ओलांडल्याच्या कारणावरून वाढीव बिल दिले जाते.

Web Title: Shock the customers of the power distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.