शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

भुयारीमार्गात खेळताना शॉक लागून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 1:21 AM

घणसोलीतील प्रकार : भुयारातील पाणी उपसण्यासाठी बसवलेत पंप

नवी मुंबई : भुयारीमार्गात साचणारे पाणी उपसण्यासाठी बसवण्यात आलेल्या विजेच्या मोटरच्या वायरचा शॉक लागून मुलाच्या मृत्यूची घटना घणसोलीत घडली आहे. क्रिकेट खेळताना त्या ठिकाणी गेलेला चेंडू घेण्यासाठी सदर मुलगा त्या ठिकाणी गेला असता हा प्रकार घडल्याचे समजते. मात्र, सदर जागा बंदिस्त केलेली असतानाही गर्दुल्ल्यांनी दारूच्या बाटल्या लपवण्यासाठी तिथला लॉक तोडल्याचा प्रशासनाचा आरोप आहे.

शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या भुयारीमार्गांचे नियोजन चुकल्याने असे भुयारीमार्ग पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, अनेक पादचारी भुयारीमार्ग वापराविना पडून आहेत. त्यामध्ये तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली तसेच रबाळे रेल्वेस्थानकालगतच्या भुयारीमार्गांचा समावेश आहे. तर ज्या भुयारीमार्गांचा काही प्रमाणात वापर केला जातो, अशा ठिकाणच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. मात्र, त्या ठिकाणी सुरक्षेची कसलीही काळजी घेतली जात नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारातून घणसोली रेल्वेस्थानकालगतच्या भुयारीमार्गाच्या ठिकाणी विजेचा शॉक लागून आमन मंजुर खान (११) याचा मृत्यू झाला आहे.लगतच्याच परिसरात तो राहणारा असून मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना भुयारातील पाण्यात गेलेला चेंडू घेण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला होता. या वेळी तिथल्या विद्युत वायरीचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीसठाण्यात मृत्यूची नोंद झाल्यानंतर पुढील तपासाकरिता पोलिसांनी पालिकेकडे माहिती मागवली आहे. त्यानुसार घणसोली विभाग कार्यालयामार्फत घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. मात्र, सदर भुयारीमार्गातील पाणी उपसण्यासाठी मोटर बसवलेली जागा लॉक लावून बंदिस्त करण्यात आलेली असल्याचे विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांनी सांगितले; परंतु काही गर्दुल्ल्यांनी तिथले लॉक तोडून आतमध्ये दारूच्या बाटल्या साठवण्याची जागा केल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याशिवाय मोटरच्या वायरीसह इतरही विद्युत वायरी त्या ठिकाणी असल्याने दुर्घटना नेमकी कशामुळे घडली हे तपासले जाणार असल्याचेही नागरे यांनी सांगितले. या घटनेवरून रेल्वेस्थानकांच्या भुयारीमार्गात वापरल्या जाणाऱ्या पंपहाउसपासून पादचाऱ्यांना धोका उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.