धक्कादायक! CISFच्या आणखी ६ जवानांची टेस्ट पॉझिटिव्ह; एकूण ११ जवान कोरोनाग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 06:03 PM2020-04-03T18:03:07+5:302020-04-03T19:22:57+5:30

कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून काल रात्री 2 एप्रिल रोजी उशिरा 146 अधिकारी/कर्मचा-यांना महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल कळंबोली येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याची आदेश जारी केले होते.    

Shocking! Test positive for 6 more CRPF personnel vrd | धक्कादायक! CISFच्या आणखी ६ जवानांची टेस्ट पॉझिटिव्ह; एकूण ११ जवान कोरोनाग्रस्त

धक्कादायक! CISFच्या आणखी ६ जवानांची टेस्ट पॉझिटिव्ह; एकूण ११ जवान कोरोनाग्रस्त

googlenewsNext

वैभव गायकर
पनवेल : केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथील 139 अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असणा-या 12 कर्मचारी यांच्यापैकी 5 जवानांना कोविड-19 टेस्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून काल रात्री 2 एप्रिल रोजी उशिरा 146 अधिकारी/कर्मचा-यांना महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल कळंबोली येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याची आदेश जारी केले होते.    

तात्काळ त्यांची कोविड-19 टेस्ट घेण्यात आली. यापैकी 6 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तात्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे कमी झाला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आल्या असून, त्यांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घातल्यामुळे नवी मुंबई परिसरातील संभाव्य धोका कमी झाला आहे. अन्य जिल्ह्यात अशा प्रकारे कोणताही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत. 

Web Title: Shocking! Test positive for 6 more CRPF personnel vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.