शूट आउट, विमानतळाच्या कामाचे सुसाट ‘टेक आॅफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:29 AM2018-10-02T03:29:46+5:302018-10-02T03:30:12+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला स्थानिकांचा मोठा हातभार लाभणार आहे. सुमारे २२६८ हेक्टर जागेवर विमानतळ उभारले जात आहे.
देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळनवी मुंबईत उभारले जात आहे. देशातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे पनवेल शहरासह संपूर्ण नवी मुंबई शहराला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला स्थानिकांचा मोठा हातभार लाभणार आहे. सुमारे २२६८ हेक्टर जागेवर विमानतळ उभारले जात आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च १६,000 कोटी रु पये इतका अपेक्षित आहे. विमानतळासाठी येथील चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, उलवा, तरघर, कोंबडभुजे ही दहा गावे कायमस्वरूपी विस्थापित होत आहेत. सिडकोने वसविलेल्या पुष्पकनगर येथे या गावांचे स्थलांतर होणार आहे. दहा गावांमध्ये सुमारे ३,५०० कुटुंबे राहत आहेत. या ठिकाणची लोकसंख्या २५ ते ३० हजारांच्या घरात आहे. विमानतळाचे सद्यस्थितीतील काम, त्यामुळे परिसरातील गावांमध्ये झालेल्या बदलाची छायाचित्रे छायाचित्रकार भालचंद्र जुमलेदार व संदेश रेणोसे यांनी टिपली आहेत.