शॉर्ट सर्किटमुळे लग्नाच्या बस्त्याची झाली राखरांगोळी; वधूच्या घराला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 04:16 PM2018-12-17T16:16:53+5:302018-12-17T16:17:25+5:30
कर्नाळा बँकेसमोर इंद्रप्रस्थ सोसायटी आहे. या सोसायटीच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जगे कुटुंबियांचे घर आहे. या घरात ते राहत नसले तरी बरंच सामान त्यामध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरात मुलीचे शनिवारी लग्न असल्याने बस्त्यासह इतर साहित्य या घरात ठेवण्यात आले होते.
पनवेल - पनवेल शहरातील टपाल नाक्यावर आज सकाळी रवींद्र जगे यांच्या घराला शॉर्ट शर्किटमुळे आग लागली. लगीन घराला लागलेल्या आगीमुळे लग्नासाठी आणलेल्या बहुतांशी सामानाची राखरांगोळी झाली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग अटोक्यात आणली. रवींद्र जगे यांच्या घरी येत्या शनिवारी लग्न असल्याने मोठी लगबग सुरु होती. मात्र आज लागलेल्या आगीमुळे बरंच सामान जळाल्याने मोठं नुकसान झालं आहे.
कर्नाळा बँकेसमोर इंद्रप्रस्थ सोसायटी आहे. या सोसायटीच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जगे कुटुंबियांचे घर आहे. या घरात ते राहत नसले तरी बरंच सामान त्यामध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरात मुलीचे शनिवारी लग्न असल्याने बस्त्यासह इतर साहित्य या घरात ठेवण्यात आले होते. आज सकाळी बंद घरात शाॅर्ट शर्किट होवून अचानक आग लागली. काही वेळानंतर धुर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी याबाबत रविंद्र जगे आणि त्यांच्या कुटुंबियांना कळवले. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलालाही या घटनेची माहिती देण्यात आली. काही मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या घरातील आग विझवली. मात्र, तोपर्यंत घरातील लाकडी फर्निचरसह बरंच सामान आगीत खाक झालेलं होतं.