नवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, शहरातील आरोग्य यंत्रणेसह कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येऊ लागला आहे. महापालिकेच्या माध्यमातून कोविड काळासाठी करण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आरोग्य भरतीला अल्प प्रतिसाद मिळाला असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा बोजा सहन करावा लागत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर महापालिकेच्या माध्यमातून कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. परंतु पुन्हा मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्याने बंद केलेले कोविड सेंटर आवश्यकतेनुसार सुरू केले जात आहेत. गेल्यावर्षी कोविड काळात नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपाची भरती करण्यात आली होती. त्यावेळी या भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेले मनुष्यबळ कमी करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले असून, महापालिकेच्या माध्यमातून गेल्या महिन्यात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एएनएम, बेडसाइड सहायक आदी पदांच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु या जाहिरातीला अल्पप्रतिसाद मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर काम करावे लागत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे महापालिका रुग्णालये तसेच नागरी आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे. महापालिकेने कोविड काळासाठी तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेकेडे केली जात आहे.फेब्रुवारीपासून वाढनवी मुंबईच फेब्रुवारीपासून बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. शनिवारी ३ एप्रिल रोजी शहरात तब्बल १२०५ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून, यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबईत आरोग्य खात्यातील भरतीला लोकांचा अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 1:32 AM