राज्यात टोमॅटोचा तुटवडा, उच्चांकी दरवाढीने टोमॅटो ‘लालेलाल’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:46 AM2023-07-05T07:46:28+5:302023-07-05T07:47:16+5:30
नागपूर बाजार समितीमध्ये विक्रमी ११० रुपये भाव : मुंबईतील किरकोळ भाव १८० रुपयांवर
- नामदेव मोरे
नवी मुंबई : टोमॅटोचा राज्यभर तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूर बाजार समितीमध्ये मंगळवारी विक्रमी ११० रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर, रामटेक, पुणे, सोलापूर बाजार समितीमध्येही टोमॅटोने शतक गाठले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये भाव ७० ते ८० रुपयांवर पोहोचले असून किरकोळ मार्केटमध्ये १४० ते १८० रुपये किलोने विक्री होत आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन २०० ते ३०० टन टोमॅटोची आवक होत असते; परंतु मंगळवारी फक्त ९२ टन आवक झाली. बाजार समितीमध्ये १ जुलैला ४५ ते ५५ रुपये दराने टोमॅटोची विक्री होत होती. आता हेच दर ७० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत. नवी मुंबई, मुंबईच्या किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो १४० ते १८० वर पोहोचले आहे.
मुंबई बाजार समितीमधील आवक व बाजारभाव
महिना बाजारभाव सरासरी आवक(टन)
जुलै २०२२ २० ते ३० ३७१
ऑगस्ट १६ ते २४ २२५
सप्टेंबर १६ ते २६ २६८
ऑक्टोबर १६ ते ३० १४५
नोव्हेंबर १६ ते २४ २४८
डिसेंबर ७ ते १० ३०२
जानेवारी २०२३ ७ ते १० २९७
फेब्रुवारी ८ ते १० २५९
मार्च १० ते १६ १९५
एप्रिल १० ते १८ १८५
मे ८ ते १२ २०७
जून ७ ते २५ २७२
जुलै ७० ते ८० ९२
राज्यातील बाजार समित्यांमधील प्रतिकिलो भाव व आवक
बाजार सरासरी बाजारभाव
समिती आवक(टन)
मुंबई ९२ ७० ते ८०
नागपूर १०० ९० ते ११०
सोलापूर ५४ १४ ते १०५
छ. संभाजीनगर ५ ५० ते १००
रामटेक ५ ८० ते १००
पुणे ९२ ३० ते १००
कोल्हापूर ७ १० ते ८५