शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

विद्यार्थ्यांनी पेन सोडून शस्त्रे घ्यावीत का?

By admin | Published: February 16, 2017 2:21 AM

ऐन परीक्षेच्या काळात प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होत असल्याचा फटका त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या

नवी मुंबई : ऐन परीक्षेच्या काळात प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होत असल्याचा फटका त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेन सोडून शस्त्रेहाती घ्यावीत का? असा संतप्त सवाल महापौर सुधाकर सोनावणे यांनी महासभेत प्रशासनाला केला, तर यापुढे कारवाई झाल्यास परिणामाची पर्वा न करता आडवा येईन, असा इशाराही त्यांनी दिला.पालिका व एमआयडीसीच्या संयुक्त विद्यमाने यादवनगर, देवीधाम नगर परिसरात अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत त्याठिकाणच्या सन २००० नंतरच्या एक हजारहून अधिक अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. परंतु या कारवायांमध्ये शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली असून ऐन परीक्षा काळात अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत झोपडपट्टीधारकांवर होत असलेल्या कारवाईचा नगरसेविका संध्या यादव यांनी निषेध नोंदवला. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सभागृहात उभे राहून यादव यांना समर्थन दर्शवले. महापौर सुधाकर सोनावणे यांनी देखील झोपड्यांवर होणाऱ्या कारवायांबाबत संताप व्यक्त केला. लोकांना झोपड्यांमध्ये राहावे लागते हे शासनाचे अपयश आहे. गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध नाहीत म्हणून अनेकांना झोपड्यांचा आसरा घ्यावा लागत आहे, तर गावठाणांमध्ये गरजेपोटी घरे बांधली जात आहेत. अशा बांधकामांना नियमित करण्यासंबंधीचे धोरण राबवण्याऐवजी सरसकट कारवाया होत असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे यापुढे झोपड्यांवर कारवाई झाल्यास मी आडवा येईन, असा इशारा त्यांनी महासभेत प्रशासनाला दिला. तसेच झोपड्यांवर कारवाई न करण्याचा अशासकीय ठराव देखील महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक नामदेव भगत यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होईपर्यंत झोपड्यांवरील कारवाई प्रशासनाने थांबवायला हवी होती अशी भावना व्यक्त केली. शिवाय बांधकामांवर कारवाई केल्यानंतर त्याठिकाणी डेब्रिज मात्र प्रशासनाकडून उचलले जात नसल्याचा त्रास सर्वसामान्यांना होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी महापालिका एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रात कारवाईवर का खर्च करतेय असा प्रश्न उपस्थित केला. तर महापौर व आयुक्त यांनी मान-सन्मान नाट्य थांबवून जनतेच्या कामांचाही विचार केला जावा असा टोला देखील मारला. नगरसेविका शुभांगी पाटील यांनी एपीएमसी आवारातील अवैध झोपड्यांमध्ये तसेच मॅफ्को मार्केटच्या पडीक इमारतीमध्ये अवैध धंदे होत असतानाही त्याठिकाणी मात्र कारवाई होत नसल्याचा संताप व्यक्त केला. यावेळी नगरसेवक अनंत सुतार यांनी आयुक्तांप्रती आदर राहिला नसून त्यांनीच नागरिक व लोकप्रतिनिधींचा तिरस्कार ओढावून घेतला असल्याचे सांगितले. तर केवळ यादवनगर तोडले म्हणजे शहर स्मार्ट सिटी झाले असे नसल्याचेही त्यांनी फटकारले. (प्रतिनिधी)