पनवेलमधील खांदा वसाहत समस्येच्या गर्तेत

By Admin | Published: August 1, 2015 11:33 PM2015-08-01T23:33:42+5:302015-08-01T23:33:42+5:30

पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पनवेलमधील खांदा वसाहतीला सध्या विविध समस्या भेडसावत आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येसह खड्डे, कचरा प्रश्न, वाहतूक

The shoulder belt of Panvel is in trouble | पनवेलमधील खांदा वसाहत समस्येच्या गर्तेत

पनवेलमधील खांदा वसाहत समस्येच्या गर्तेत

Next

- वैभव गायकर,  पनवेल
पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पनवेलमधील खांदा वसाहतीला सध्या विविध समस्या भेडसावत आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येसह खड्डे, कचरा प्रश्न, वाहतूक, पार्किं गच्या समस्येमुळे परिसरातील रहिवाशी हैराण झाले आहेत. सिडको प्रशासन देखील याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशी करीत आहेत.
शहराचा महत्त्वाचा भाग असलेल्या सेक्टर ७ मधील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. खांदा वसाहतीत नाक्यानाक्यावर वाढदिवस, सण उत्सवानिमित्त लावण्यात आलेले बॅनर्स महिनोन्महिने उतरवले जात नसल्याने खांदा वसाहतीला विद्रुप रूप आले आहे. सेक्टर ८, ९ मध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. उघड्यावर कचरा टाकू नये, यासाठी सिडकोने सूचना फलक लावले असले तरी नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत आहेत.
वसाहतीत अनेक ठिकाणी पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्र मण केले आहे. शिवाजी चौक याठिकाणी मटन विक्रेते, मच्छीविके्र ते, भाजीपाला विक्रेत्यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. यामुळे नागरिकांना पदपथावर चालण्यास अडथळा निर्माण होत आहे. अनेक तक्र ारी करून देखील सिडको प्रशासन याची दखल घेत नसल्याची प्रतिक्रिया येथील रहिवासी मनोज पाटील यांनी दिली. शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे देखील याठिकाणी लहान-मोठे अपघात घडत आहेत. शहरात अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली असून पावसाला सुरु वात होताच गटारामधील पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे याठिकाणाची नालेसफाई देखील अर्धवट झाली असल्याचे दिसून येत आहे.

खांदा कॉलनीमधील स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी शहरातील समस्यांबाबत अनेक वेळा पाठपुरावा करून देखील सिडको प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील गटारामधील गायब झालेली झाकणे बसविण्यासंदर्भात सिडको प्रशासनाला अनेक वेळा पत्र लिहून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याची प्रतिक्रि या त्यांनी दिली. सिडको अधीक्षक अभियंता प्रदीप तांबडे यांच्याशी प्रतिक्रि या जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: The shoulder belt of Panvel is in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.