कळंबोली : खांदा वसाहतीत बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकण्यात येत आहे. गुरुवारी माजी उपनगराध्य गणेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणला. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ते जमा करण्यात आले. यापैकी बहुतांशी वेस्ट लॅबमधील असल्याचे दिसून आले आहे.पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात दवाखाने, रुग्णालये आणि मेडिकल्स आहेत. या ठिकाणी निर्माण होणाऱ्या बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मुंबई वेस्ट मॅनेजमेट या संस्थेची नियुक्ती केली आहे. मात्र, कचरा उचलण्यासाठी पैसे लागत असल्याने काही रुग्णालये डॉक्टर, मेडिकल तसेच पॅथॉलॉजीमधून बायो मेडिकल वेस्ट साध्या कचºयात, मोकळ्या जागेत टाकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.शनिवारी सकाळी खांदा वसाहतीत शिवाजी चौकातून सीकेटी महाविद्यालयाकडे जाणाºया रस्त्याच्या कडेला बायो मेडिकल वेस्ट टाकण्यात आल्याचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर लगेचच पर्यवेक्षक मनोज टाक, आदेश गायकवाड आणि मनोज चव्हाण या ठिकाणी आले. त्या कचºयामध्ये युरिनच्या चाचणीकरिता वापरण्यात येणारे कंटेनर, त्याचबरोबर रक्ताचे नमुने साठवण्याकरिता वापरण्यात येणाºया बाटल्यांचा समावेश होता, त्याचबरोबर सीरिंज आणि सुयाही सापडल्या.आरोग्य विभागाकडून बाजूला असलेल्या भालेकर लॅबमध्ये बायो मेडिकल वेस्ट बाबत विचारणा केली असता, हा कचरा आमचा नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, कंटेनर आणि सॅम्पल कलेक्ट करणाºया बाटल्यांवरील रुग्णांच्या नावांची पडताळणी लॅबच्या डाट्यामध्ये केली असता, हे वेस्ट याच लॅबमधील असल्याचे उघड झाले.
खांदा वसाहतीत बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 4:48 AM