कळंबोली वाहतूक पोलिसांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:09 AM2017-07-19T03:09:14+5:302017-07-19T03:09:14+5:30

कळंबोली सर्कलला सर्व रस्ते एकत्रित येत असल्याने जंक्शनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे वाहनांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक

Shramdan of Kalamboli Traffic Police | कळंबोली वाहतूक पोलिसांचे श्रमदान

कळंबोली वाहतूक पोलिसांचे श्रमदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : कळंबोली सर्कलला सर्व रस्ते एकत्रित येत असल्याने जंक्शनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे वाहनांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्यात आल्या नाही. म्हणून सोमवारी सायंकाळी पोलिसांनी श्रमदान करून खड्डे बुजवले.
कळंबोली सर्कलला जोडणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने रस्त्याच्या दुरु स्तीस विलंब होत आहे.
पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्याकडून संबंधित विभागांना पत्र देण्यात आले, परंतु त्यांची उदासीनता कायम असल्याचे दिसून आले. शेवटी कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी गोरख पाटील यांनी वाहतूक कर्मचाऱ्यांना बरोबर घेतले. त्यांनी खडी आणि डेब्रिज मागितले. त्यांच्या मदतीने ाोमवारी सायंकाळी रस्त्यावरील खड्डे खडीने बुजविले.

वाशी ते कळंबोलीपर्यंतच्या सर्व वाहतूक शाखेने संबंधित यंत्रणांकडे खड्डे बुजविण्याकरिता पत्रप्रपंच केला, परंतु त्यांच्याकडून फारशा प्रतिसाद मिळाला नाही. कळंबोली जंक्शनवर खूपच खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. म्हणून आम्ही हातात फावडे, घमेले घेवून येथील खड्डे बुजवले. यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.
- गोरख पाटील,
प्रभारी अधिकारी,
कळंबोली वाहतूक शाखा

Web Title: Shramdan of Kalamboli Traffic Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.