पनवेल : देशभरात जन्मजात नवजात बालकांमध्ये आढळणाऱ्या हृदयाच्या मोफत शस्त्रक्रिया करणाऱ्या श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलने सुमारे 30 हजार मोफत शस्त्रक्रियांचा टप्पा गाठला आहे. यावेळी खारघरमधील श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात गिफ्ट ऑफ लाईफ या कार्यक्रमाचे आयोजन दि.16 रोजी करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर उपस्थित होते.
रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ एस श्रीनिवास देखील उपस्थित होते.भारतासारख्या देशात लहान मुलाचा हृदयविकार ही केवळ त्याच्या उपचारांशी संबंधित समस्या नसून तो त्याच्या कुटुंबासाठी आर्थिक भारही आहे आणि अशा परिस्थितीत रुग्णालय या बालकांना जीवनदान देण्याचे उत्कृष्ट कार्य करत आहे. श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलने श्री सत्य साई संजीवनी हेल्थकेअर स्किल्स डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट येथे भारतातील पहिला मोफत आरोग्य सेवा कौशल्य प्रशिक्षण केंद्र देखील सुरु करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात इयत्ता 10वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा कार्यक्रम दिला जातो आणि त्याच्या निधीची व्यवस्था देखील संस्थेद्वारे केली जाते. हा कार्यक्रम आरोग्य सेवा क्षेत्रातील वैद्यकीय आणि सर्जिकल सहाय्यकांसह कुशल आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या मागणीवर लक्ष केंद्रित करतो, विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षणाव्यतिरिक्त कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकास प्रदान करतो. देशभरातील ग्रामीण तरुणांचा विशेषतः सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागातील ग्रामीण तरुणांचा आत्मविश्वास वाढविणारा आणि त्यांना सक्षम करणारा हा एक कार्यक्रम आहे.सुनील गावस्कर यांनी या शस्त्रक्रियासाठी स्वतः मदत केली आहे.