खारघरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:31 AM2017-08-13T03:31:47+5:302017-08-13T03:31:47+5:30
खारघरमधील इस्कॉनच्या वतीने श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १३ आॅगस्टपासून सुरू होणारा हा महोत्सव बुधवार, १६ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
नवी मुंबई : खारघरमधील इस्कॉनच्या वतीने श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १३ आॅगस्टपासून सुरू होणारा हा महोत्सव बुधवार, १६ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
मंदिराचे प्रमुख स्वामी सूरदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्माष्टमी उत्सवांतर्गत १५ आॅगस्टला संध्याकाळी ७.३० वाजता श्रीकृष्ण कलश अभिषेकचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १२ वाजता भगवान कृष्णाचा मंदिरामध्ये अभिषेक करण्यात येईल. या महोत्सवात अनुप जलोटा भजन सादर करणार असून, रोनू मजुमदार बासरी वादन सादर करणार आहेत. गायिका अनुराधा पौंडवालही या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. विनोद त्रिवेदी, विक्र म पर्लीकर हेसुद्धा भजन सादर करणार आहेत. व्यासपूजेने या उत्सवाची सांगता केली जाणार आहे. भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून, धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.