शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नवी मुंबईतल्या कोकण भवन कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:54 AM

नवी मुंबईतील अनेक कार्यालयांत मंगळवारी तुरळक उपस्थिती होती. राज्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण भवन कार्यालयात तर शुकशुकाट होता.

नवी मुंबई : नवी मुंबईतील अनेक कार्यालयांत मंगळवारी तुरळक उपस्थिती होती. राज्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण भवन कार्यालयात तर शुकशुकाट होता. त्याशिवाय शहरातील अनेक अनुदानित शाळा व महाविद्यालयांत शिक्षकांनी बंदमध्ये सहभाग घेऊन निदर्शने केली.राज्य सरकारी कर्मचाºयांकडून पुकारण्यात आलेल्या संपामुळे शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालये ओस पडली होती. पनवेल आणि उरण येथील प्रांत आणि तहसील कार्यालयांत कर्मचाºयांनी बंद पुकारून निदर्शने केली; तसेच वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी बंद पुकारून महाविद्यालयासमोर लाक्षणिक निदर्शने केली. त्यामुळे येथे वातावरण काहीसे तापलेले पाहायला मिळाले. याचप्रमाणे सीबीडी येथील बहुतांशी शासकीय कार्यालयांत कर्मचाºयांची तुरळक उपस्थिती पाहायला मिळाली. याचा परिणाम येथील कामकाजावर झाला.ठाणे पंचायत समित्यांमध्ये कमी उपस्थितीठाणे : राज्य सरकारी कर्मचाºयांसह जिल्हा परिषद कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी पहिल्या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह, तहसील कार्यालय आणि बांधकाम विभागात कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यामुळे येथील सर्व कामे थांबलेली होती.येथील शिक्षण विभागासह सामान्य प्रशासन, समाजकल्याण आदी विभागांत मात्र कर्मचाºयांची उपस्थिती बºयापैकी आढळली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि परिचारिका संपात सहभागी झाल्या होत्या.मात्र, डॉक्टर सेवेत असल्यामुळे रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही. रुग्णांची तपासणी व त्यांच्यावरील उपचार आदी कामे सुरळीत होती.ठाणे जिल्हा परिषदेत कर्मचाºयांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. याशिवाय ठाणे शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमधील शिक्षकांनी संपात सहभाग घेतल्याचे निदर्शनात आले. तसेच पंचायत समित्यांमध्ये उपस्थिती कमी होती.>पालघरमध्ये महसूल कार्यालय ओसपालघर : सरकारी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर दिसला नाही. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरू होत्या; मात्र, खासगी अनुदानित शाळा बंद होत्या. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाल्याने विद्यार्थी, शेतकरी यांना नाहक त्रास सहन करावा लागला.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, रोजगार हमी योजना, निवडणूक शाखा, भूसंपादन विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयातील ६३पैकी २ अधिकारी या संपात सहभागी झाले होते. तर ‘क’ गटातील मंडळ अधिकारी, तलाठी, अवल कारकून अशा ४०० जणांपैकी ३७६ अधिकारी-कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. महसूल विभागाच्या विविध आस्थापनांत असलेल्या एकूण ७० शिपायांपैकी ६८ शिपायांनी या संपात आपला सहभाग नोंदविल्यामुळे या सर्व आस्थापनांना बिगर शिपाई काम करावे लागले. जिल्ह्यातील एकूण ५३३पैकी ४४६ अधिकारी - कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.>अलिबागमधील १२ हजार कर्मचारी संपात सहभागीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध २५ संघटनांतील तब्बल १२ हजार कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतला. एकाच वेळी मोठ्या संख्येने संप पुकारण्यात आल्याने सरकारी कार्यालये, जिल्हा परिषदेमधील कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे हाल झाले. राजपत्रित अधिकारी महासंघाने संपातून अचानक माघार घेतल्याने ते संपामध्ये सहभागी झाले नाहीत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर तर अन्य तालुक्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयावर आंदोलकांनी धडक दिली आहे. संपामध्ये सर्व कर्मचारी सहभागी असल्याने विविध कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. सरकारी कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे संपामुळे चांगलेच हाल झाले.