खारघरमध्ये स्थलांतरित सायबेरियन सँडपायपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:27 PM2020-12-16T23:27:02+5:302020-12-16T23:27:06+5:30

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने दिला दुजोरा

Siberian sandpiper migrating to Kharghar | खारघरमध्ये स्थलांतरित सायबेरियन सँडपायपर

खारघरमध्ये स्थलांतरित सायबेरियन सँडपायपर

googlenewsNext

-  वैभव गायकर

पनवेल : खारघरमध्ये एका पक्षी निरीक्षकाला नुकताच सायबेरियात आढळणारा दुर्मीळ सँडपायपर पक्षी आढळला आहे. खारघर शहराला निसर्गाचे वेगळे वरदान लाभले आहे. त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी खारघर हिल, शहरालगतच्या खाडीकिनारी आढळत असतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेनेही संबंधित पक्षी येथे स्थित असल्याला दुजोरा दिला.
पक्षिनिरीक्षक नरेशचंद्र सिंग यांना हा सायबेरियन सँडपायपर सर्वप्रथम नोव्हेंबरमध्ये शहरातील सेंट्रल पार्कच्या प्रस्तावित दुसऱ्या टप्प्यात आढळला होता. अधिक माहिती मिळविल्यावर त्यांच्या लक्षात आले की हा पक्षी स्थलांतरित असून तो मूळ सैबेरियात आढळतो. हिवाळ्यात मोठ्या संख्येने हे पक्षी हवामान बदलासाठी भारतात येतात. खाडीकिनारी, समुद्रकिनारी या पक्षाचे वास्तव्य असते. खाडीकिनारी चिखलात आढळणारे किडे या पक्षाचे मुख्य खाद्य आहे. नवी मुंबईमधील टी. एस. चाणक्यजवळील खाडीकिनारी असलेल्या तलावालगत सर्वप्रथम हा पक्षी फेब्रुवारी महिन्यात निदर्शनास आला होता. तेव्हा बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे शास्त्रज्ञ मृगक प्रभू यांनी या पक्षाला टॅग लावला होता. खारघर शहराला मोठा खाडीकिनारा लाभला आहे. खाडीकिनारी १०० ते १५०च्या आसपास विविध प्रजातींचे पक्षी आढळत आहेत. यामध्ये ७ पक्षांच्या प्रजाती अत्यंत दुर्मीळ असल्याची माहिती पक्षी निरीक्षक नरेशचंद्र सिंग यांनी दिली.

खाडीवरील भराव चिंतेचे
खारघर शहराला लाभलेल्या खाडीकिणारी सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात भराव सुरू आहे. काही डेब्रिजमाफिया भराव टाकून ही नैसर्गिक पाणथळे नष्ट करीत असल्याने ही बाब चिंतेची असल्याचे मत नरेशचंद्र सिंग यांनी व्यक्त केली आहे.

पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करावे
खारघर शहराला लाभलेली नैसर्गिक साधनसंपदा लक्षात घेता पक्षी निरीक्षणासाठी या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित करण्याची गरज आहे. शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या नैसर्गिक पाणथळींचे जतन करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Siberian sandpiper migrating to Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.