शिवसेनेचा महापौरांना घेराव
By admin | Published: July 11, 2015 03:43 AM2015-07-11T03:43:23+5:302015-07-11T03:43:23+5:30
सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी मांडू न दिल्यामुळे शिवसेनेने आंदोलन केले. महापौरांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.
नवी मुंबई : सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी मांडू न दिल्यामुळे शिवसेनेने आंदोलन केले. महापौरांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.
शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनी गरजेपोटी बांधलेली घरे व इतर बांधकामांवर होत असलेल्या कारवाईविषयी पालिकेने ठोस धोरण ठरवावे, याविषयी लक्षवेधी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मांडली होती. परंतु सभा सुरू झाल्यानंतर लक्षवेधी चर्चेला घेतली नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हा विषय गंभीर असून यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु चर्चा होऊ न दिल्यामुळे नगरसेवकांनी महापौरांच्या खुर्चीसमोर जाऊन घोषणाबाजी केली. प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर सत्ताधारी गंभीर नसल्याचा आरोप केला. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर चर्चा करू, असे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु सर्व प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तत्काळ सभा संपल्याचे महापौरांनी घोषित केले. याविषयी शिवसेना नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)