शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

सायन-पनवेल महामार्ग बनलाय अपघातांचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 1:53 AM

सायन-पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे. अनेक महिन्यांपासून वाशी ते पनवेल दरम्यानचे पथदिवेही बंद असून, त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे.कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईत येण्यासाठी सायन - पनवेल हाच प्रमुख मार्ग आहे. या रोडवरून रोज दोन लाख वाहनांची ये - जा सुरू असते. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरण केले. विस्तारीकरणासाठी ठेकेदाराने केलेला खर्च भरून काढण्यासाठी खारघरमध्ये ६ जून २०१५ रोजी टोलनाकाही सुरू केला आहे; परंतु ठेकेदाराने कामे पूर्ण केली नाहीत व नवीन रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे महामार्गाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. दीड वर्षामध्ये महामार्गाने १०५ बळी घेतले आहेत.वाशी ते कळंबोलीदरम्यान २० किलोमीटर रोडवरील पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. महामार्ग अंधारात असल्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. दीड वर्षामध्ये २५०पेक्षा जास्त अपघात होऊन १०५ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामधील अनेक अपघात रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे झाले आहेत. उरण फाटा येथे ९ जुलैला अंधारामुळे टँकर १०० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली होती. तुर्भे येथेही अंधारामुळे वारंवार अपघात होऊ लागले आहेत.>पालकमंत्र्यांनी दिले आदेशसायन - पनवेल महामार्गावर अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. याविषयी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनाही याविषयी माहिती नव्हती. अधिकाºयांना विचारणा केल्यानंतर त्यांनाही याविषयी माहिती देता आली नाही. शिंदे यांनी याविषयी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले आहेत.>येथे होतात अपघातसानपाडा उड्डाणपूल, तुर्भे शरयू हुंडाई शोरूमसमोरील रस्ता, शिरवणे पूल, उरण फाटा, बेलापूर उड्डाणपूल, कळंबोली या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.>दीड वर्षातील अपघातांचा तपशीलठिकाणी अपघात मृतांचीसंख्यापनवेल ३९ १४कळंबोली १८ ०९खारघर ५० २५बेलापूर - १८ ०७नेरूळ - ३५ १५सानपाडा- ०८ १२वाशी - ७६ १३