नवी मुंबई : कौटुंबिक वादातून भावाने पत्नी व बहिणीवर केलेल्या हल्ल्यात बहिणीच्या मृत्यूची घटना घडली आहे. नेरूळ सेक्टर २० येथे हा बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.नागेश हा पत्नी ज्योत्स्ना (२६), बहीण सुनीता (३०) व भाऊजी अजय सिंग यांच्यासह एकाच घरात राहायला होता. काही दिवसांपासून त्याला पत्नी आणि भाऊजी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून बुधवारी सकाळी नागेशने अजयवर चाकूहल्ला केला. परंतु नागेशची बहीण सुनीता यांनी हल्ला स्वत:वर घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.तर ज्योत्स्ना यांनी पती नागेशला आवरण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्यावरही वार करून घरातून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनीता व ज्योत्स्ना यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी सुनीता यांना मृत घोषित केले, तर ज्योत्स्ना यांच्यावर नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेप्रकरणी त्याच्याविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर फरार झालेल्या नागेशच्या शोधाकरिता पथके तयार करण्यात आली आहेत.
>हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल आधी झाली शिक्षानागेश लाड हा पूर्वी रिक्षा चालवायचा. त्याला त्याच्या पत्नीच्याचारित्र्यावर संशय होता. नागेशला यापूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. काही दिवसांपूर्वीच या गुन्ह्यातली शिक्षा भोगून तो कारागृहाबाहेर आला होता.