योगेश पिंगळेनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नेरुळ येथे चार भुयारी मार्ग बनविले होते. भुयारी मार्गाचे काम अपूर्ण असल्याने त्याचा वापर होत नाही. गेल्या वर्षी महापालिकेने लाखो रु पये खर्च करून भुयारी मार्गाची दुरु स्ती केली आहे; परंतु अद्याप मार्गांचा वापर केला जात नसल्याने दुरवस्था झाली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने भुयारी मार्ग नागरिकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत.
सायन-पनवेल महामार्ग रुंदीकरणावेळी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेरुळ एलपी येथे दोन, एसबीआय कॉलनीजवळ एक आणि उरण फाटा येथे एका भुयारी मार्गाची निर्मिती केली होती; परंतु अनेक वर्षे या भुयारी मार्गांचे काम अपूर्ण असल्याने या भुयारी मार्गांचा गैरवापर होत होता. भुयारी मार्ग नागरिकांना वापरासाठी सुरू व्हावेत, यासाठी महापालिकेने गेल्यावर्षी सुमारे ४३ लाख खर्चून दुरु स्ती केली होती. यामध्ये भुयारी मार्गांमध्ये विद्युत पंप, भिंतींना प्लॅस्टर, छतास पॉली कार्बोनेट शीट, फ्लोरिंग, पायऱ्या तसेच भिंतींच्या डॅडोच्या टाइल्सची दुरुस्ती, भुयारी मार्गाला जोडणाºया पदपथांची कामे, प्लम काँक्र ीट, रंगकाम, माहिती फलक, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी कामे केली होती. महापालिकेने लाखो रु पये खर्च करूनही वापर नसल्याने भुयारी मार्ग गर्दुल्ल्यांचा अड्डा बनले आहेत. भुयारी मार्गांमध्ये कचरा, मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि मोठ्या प्रमाणावर पाणीदेखील साचले आहे. यामुळे भुयारी मार्गांजवळील परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ शहर अभियान आहे; परंतु गेल्या वर्षी लाखो रु पये खर्च केलेल्या भुयारी मार्गांच्या स्वच्छतेचा महापालिकेला विसर पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.