शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

खड्ड्यांमुळे सुकापूर-नेरे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:35 AM

पनवेल-माथेरान महामार्गावरील सुकापूर-नेरे दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल-माथेरान महामार्गावरील सुकापूर-नेरे दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हा रस्ता खड्डेमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत हा महामार्ग येत आहे.माथेरान हिल स्टेशनकडे जाण्यासाठी या मार्गाचा मोठा वापर होत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. पनवेल शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने अनेक गृहप्रकल्प या मार्गावर उभे राहत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस उभारले असल्याने दिग्गज क्रि केटर, सिने अभिनेत्यांचाही या मार्गाने वावर वाढला आहे. मात्र सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. ४० पेक्षा जास्त गावे, आदिवासी पाड्यामधील रहिवासी या मार्गावरून दररोज ये-जा करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे याठिकाणाहून ये-जा करणारी वाहनेही नादुरुस्त होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. वाहनांचे अनेक भाग या खडतर मार्गामुळे निखळत असल्याचे सुकापूर येथील रहिवासी रु पेश पाटील यांनी सांगितले. तक्र ार करून देखील सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करीत आहे.>नवीन पनवेलच्या पोस्ट कार्यालयासमोर खड्डेनवीन पनवेलच्या पोस्ट कार्यालयासमोर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना या खड्ड्यांतून वाट काढत पुढे जावे लागते. मात्र, सिडकोचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. नवीन पनवेल सेक्टर-१९मध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असते. हाँगकाँग मार्केट, पोस्ट कार्यालय, पुस्तकांची दुकाने याच सेक्टरमध्ये येत असल्याने, नागरिकांची गर्दी पाहावयास मिळते. मात्र, पोस्ट कार्यालयासमोरच मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.गेल्याच आठवड्यात येथील रस्ता खचल्याने विटांनी भरलेला ट्रक रस्त्यात रुतला होता. यातून अद्यापही सिडकोला जाग आलेली नाही. खड्डे पडल्याने या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, येथे कामासाठी येणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पोस्ट कार्यालय असूनही या खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याने या खड्ड्यांचे आता विस्तारीकरण होत असून ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन पनवेलकरांकडून संतापयुक्त नाराजी व्यक्त होत आहे. येथून जवळच बांठिया शाळा असून, या रस्त्यावरून दररोज हजारो विद्यार्थी ये-जा करतात.खड्ड्यांतून वाट काढत विद्यार्थी, ग्रामस्थ, पादचारी व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गणेशोत्सव सण तोंडावर आलेला असताना देखील सिडको या खड्ड्यांकडे कानाडोळा करताना दिसत आहे.>खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉक आणि बारीक खडीनवी मुंबई : बारीक खडीचा वापर करून महामार्गावरील खड्डे बुजविले जात आहेत. मात्र, यामुळे अपघातांचे प्रमाण आणखी वाढले आहे. खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली बारीक खडी इतरत्र पसल्याने गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी मात्र पेव्हर ब्लॉक बसविण्याची शक्कल लढविण्यात आल्याचे दिसून येते. रस्त्याची मलमपट्टी करूनही पूर्ववत होत नसल्याने ही उपाययोजना कुचकामी ठरत आहे.महापालिकेने रस्त्यांची कामे करूनही परिस्थिती जैसे थे आहे. बेलापूर-खारघर सर्व्हिस रोड तसेच सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी परिसरात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेला भराव खचल्याने परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डे बुजविण्यासाठीचा भराव खचल्याने बारीक खडी रस्त्यात पसरली असून दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोट्यवधी रुपये रस्त्यावर खर्च करूनही शहरातील रस्त्यांची सुधारणा होत नाही. गॅस पाइपलाइनचे काम, खोदकामामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.सिमेंट-काँक्रीटचा बनवण्यात आलेला रस्ता काही कामांसाठी खोदल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत.>अपघातांना आमंत्रणअनेक परिसरात गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्ते खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे वाहनधारकांना तसेच पादचाºयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.