महापालिकेकरिता सहा निवडणूकनिर्णय अधिकारी

By admin | Published: April 26, 2017 12:34 AM2017-04-26T00:34:13+5:302017-04-26T00:34:13+5:30

पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सहा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Six election officers for the municipal corporation | महापालिकेकरिता सहा निवडणूकनिर्णय अधिकारी

महापालिकेकरिता सहा निवडणूकनिर्णय अधिकारी

Next

कळंबोली : पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सहा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या एक-दोन दिवसांत संबंधित अधिकारी या ठिकाणी येतील असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. उपजिल्हाधिकारी दर्जाचे हे अधिकारी असणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मदतीला तहसीलदार दर्जाचे साहाय्यक निवडणूक अधिकारी असणार आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण वीस प्रभागांचा समावेश आहे. त्यामधून ७८ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. पनवेल शहरासह सिडको वसाहतीत आणि समाविष्ट करण्यात आलेली गावे महापालिका हद्दीत आहे. विस्तृतीत क्षेत्रफळ असलेल्या पनवेल महानगरपालिका हद्दीत ५,०९,९०१ इतकी लोकसंख्या तर ४,२५,४५३ मतदार आहेत. एकूण ५७० मतदान केंद्रांवर २४ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याची जुळवाजुळवी महापालिका प्रशासनाने सुध्दा सुरू केलेली आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या निवडणुकीत फक्त एकच निवडणूक निर्णय अधिकारी नसणार आहेत, तर त्याकरिता एकूण सहा जणांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक तीन ते चार प्रभाग मिळून एक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. त्यांच्यावर त्या प्रभागाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीला एक साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. पनवेल, नवीन पनवेलमधील पाच प्रभागांसाठी दोन, तर १, २, ३ या प्रभागासाठी नावडे येथे, खारघरमध्ये ४५, ६ कामोठे वसाहतीत ११,१२,१३ क्र मांकांच्या प्रभागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. कळंबोलीत ७, ८, ९, १० या चार प्रभागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. तेथून मतदानापूर्वी काम सुरू करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Six election officers for the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.