जमिनीच्या बहाण्याने सहा लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 11:58 PM2019-03-05T23:58:28+5:302019-03-05T23:58:33+5:30
बदलापूर येथे कर्जत रोडला चार गुंठे जागा २५ लाख रु पयांत देतो, असे सांगून, दत्तात्रेय दामोदर पाटील (५०) यांची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
पनवेल : बदलापूर येथे कर्जत रोडला चार गुंठे जागा २५ लाख रु पयांत देतो, असे सांगून, दत्तात्रेय दामोदर पाटील (५०) यांची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ते पनवेलमधील घोट येथील रहिवासी असून, या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तात्रेय दामोदर पाटील यांना दिनेश रामचंद्र भोईर (नेरळ, ता. कर्जत) यांनी जमीन विक्र ी करायची असल्याचे सांगितले. यासाठी दोघे नवीन पनवेल येथे भेटले. भोईर यांची शिरगांव, बदलापूर येथे कर्जत रस्त्यालगत पेट्रोलपंपासमोर चार गुंठे जागा असून, तिची किंमत सहा लाख रुपये गुंठ्याप्रमाणे सांगून, दिनेश यांनी पाटील यांना सदरची जागा दाखवली. सदरची जागा पाटील यांना पसंत पडल्याने पाटील यांनी दिनेश भोईर यांच्याकडे जागा मालकीबाबतची कागदपत्रे विचारली, या वेळी त्यांना सर्व्हे नं ३२/१/ ए प्लॉट नं ३ गाव शिरगांव, ता. अंबरनाथ, ठाणे या जमिनीच्या ७/१२ उताऱ्याची प्रत दाखवण्यात आली. अखेर जागेचा व्यवहार व रजिस्ट्रेशन असा २५ लाख रु पयांस व्यवहार ठरला. जागेच्या व्यवहारापोटी सहा लाख रु पये देण्यात आले. मात्र, त्यानंतर पाटील जागेच्या पाहणीसाठी गेले असता, परिसरातील रहिवाशांनी ही जागा भोईर यांची नसल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भोईर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.