नवी मुंबई : पाणीपुरवठा सेवेकरिता उभारण्यात आलेल्या जलदगती माहिती व नियंत्रण यंत्रणा (स्काडा) बंद असताना ठेकेदाराला बिल देण्यात आले आहे. या प्रकरणाची एक महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीत केली.
पाणीपुरवठा विभागाचे काम प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेने ३५ कोटी रुपये खर्च करून स्काडा यंत्रणा सुरू केली होती. मोरबे धरण परिसरातील पावसाची व धरणाच्या पातळीची नोंद ठेवता यावी. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील आठ फिल्टर बेडच्या बॅकवॉश यंत्रणेचे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष येथून परीक्षण करता यावे. मनपा क्षेत्रातील ईएसआर, जीएसआर, एचएसआर येथे येणाऱ्या आणि जाणाºया पाण्याच्या दाबाची व प्रवाहाची नोंद ठेवणे. सेक्टर-२८ मधील बेलापूर पंप हाउस आणि दिघापर्यंतच्या पाण्याच्या प्रवाहाची नोंद घेण्यासह मीटर रीडिंगसाठी ही प्रणाली राबविण्यात येणार होती. बेलापूर ते दिघापर्यंत गुरुत्वाकर्षणाने पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते; पण प्रत्यक्षात ही प्रणाली योग्यपद्धतीने सुरूच झाली नाही. यंत्रणा बंद असताना ठेकेदाराला बिले देण्यात आली आहेत. यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात बहुतांश मीटर चोरीला गेले आहेत. याकडेही लक्ष वेधण्यात आले. स्थायी समिती सदस्यांनी केलेल्या दौºयात स्काडाच्या सीबीडी येथील केंद्रात काहीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादी काँगे्रसचे देवीदास हांडे-पाटील, द्वारकानाथ भोईर, शिवराम पाटील, नवीन गवते यांनी स्काडामधील त्रुटी निदर्शनास आणल्या. सभापती सुरेश कुलकर्णी यांनीही प्रशासनाला स्काडा प्रणालीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनीही एका महिन्यात चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला दिल्या, यामुळे स्काडा प्रणाली पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे. चौकशी कोण करणार व चौकशीमध्ये काही गैरप्रकार निदर्शनास आल्यास कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्काडाच्या यापूर्वीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करताना सदस्यांनी यापुढे ही यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी ४ कोटी २४ लाखांच्या खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.यापूर्वीच्या स्काडा प्रणालीची वस्तुस्थितीप्रकार संख्या सुरू बंदअल्ट्रासोनिक फ्लो मीटर १८० ३१ १४९मॅग्नेटिक फ्लो मीटर ५० ५ ४५प्रेशर ट्रान्समीटर १४४ ३५ १०९लेव्हल ट्रान्समीटर ५८ ६ ५२क्लोरीन ट्रान्समीटर ५३ ० ५३पीएच ट्रान्समीटर ४ ० ४अॅक्च्युएटर १५२ २ १५०नगरसेवकांची दुटप्पी भूमिकाच्स्काडा प्रणालीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दोन आठवडे स्थगित करण्यात आला होता. ही प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचा दावा करण्यात आला होता.च्सदस्यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतले व अखेर तो सर्वमताने मंजूर केला आहे, यामुळे नगरसेवकांनी यापूर्वी नक्की कशासाठी विरोध केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थायी समितीमध्ये दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याची टीकाही होऊ लागली आहे.