कौशल्य विकास कार्यक्रमाचा पालघर जिल्ह्यात आदिवाशी भागात बोजवारा ?

By admin | Published: September 30, 2016 06:14 PM2016-09-30T18:14:24+5:302016-09-30T18:14:24+5:30

कौशल्य विकास हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या कौशल्य विकास कार्यक्रमामुळे बेरोजगार युवकांना प्रशिक्षण दिल्यामुळे कुशल

Skill development program in the tribal areas of Palghar district? | कौशल्य विकास कार्यक्रमाचा पालघर जिल्ह्यात आदिवाशी भागात बोजवारा ?

कौशल्य विकास कार्यक्रमाचा पालघर जिल्ह्यात आदिवाशी भागात बोजवारा ?

Next

राहुल वाडेकर 
          
विक्रमगड, दि. ३० - कौशल्य विकास हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या कौशल्य विकास कार्यक्रमामुळे बेरोजगार युवकांना प्रशिक्षण दिल्यामुळे कुशल मनुष्यबळ तयार होईल. परिणामत: युवकांना निश्चितपणे रोजगाराची संधी मिळणार आहे. हा या मागचा उद्देश आहे.

   या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात प्रथम वाडा येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते...त्यातून वाडा व विक्रमगड़ तालुक्यातील ९० बेरोजगारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. त्यांना बोईसर येथील बॉम्बे रियोंन फॅशन ली. ह्या कंपनीत प्रशिक्षणासाठी नेण्यात आले. तेथे त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी हेल्पर म्हणून काम करायला लावुन झाडू मारणे, प्लांट मधील पाणी काढायला लावणे, सुताचे रोल भरून येणाऱ्या गाड्या खाली करायला लावणे अशी कामे करायला लावल्याने हे प्रशिक्षणार्थी कंटाळून शेवट प्रशिक्षण सोडून घरी आले.

त्याच बरोबर येथे दिले जाणारे जेवण सुद्धा खुप कमी मिळत असल्याची तक्रार अनेक प्रशिक्षणार्थीनी बोलून दाखवली.
   वाडा येथे झालेल्या हया कार्यक्रमानंतर वाडा व विक्रमगड तालुक्यातील ९० जणांची निवड करण्यात आली मात्र ह्या ९० जणांपैकी जवळपास ८० प्रशिक्षणार्थी निघुन आले आहेत. त्यामुळे ह्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा बोजवारा उडल्याचे दिसून येत आहे.


 

Web Title: Skill development program in the tribal areas of Palghar district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.