ठळक मुद्देसहापैकी एकाला बाहेर काढण्यात आले असून अडकलेल्या उर्वरित 5 जणांना देखील बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
पनवेल : खारघर सेक्टर 20 मधील नव्याने बांधकाम सुरु असलेल्या निर्माणाधीन इमारतीचा सर्वात वरच्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. सहापैकी एकाला बाहेर काढण्यात आले असून अडकलेल्या उर्वरित 5 जणांना देखील बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी पालिका प्रशासन ,पोलीस तसेच अग्निशमन अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे.