पालिकेत ‘पाणी वाचवा’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2015 12:02 AM2015-08-21T00:02:21+5:302015-08-21T00:02:21+5:30

स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे

The slogan 'Save the water' in the water | पालिकेत ‘पाणी वाचवा’चा नारा

पालिकेत ‘पाणी वाचवा’चा नारा

Next

नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाणीगळती व चोरीची चाौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली आहे.
काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी नवी मुंबईमधील पाण्याच्या उधळपट्टीविषयी व पाणी गळतीविषयी लक्षवेधी मांडली होती. दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या लक्षवेधीवर गुरुवारी चर्चा करण्यात आली. स्वच्छतेविषयी नवी मुंबईला देशात तिसरा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. परंतु पाण्याच्या नियोजनात मात्र पालिका अपयशी ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेने मोरबे ते कळंबोली व पूर्ण शहरात पाइपलाइन टाकली आहे. परंतु यानंतरही प्रचंड पाणीगळती सुरू आहे. लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यास प्रशासनास अपयश आले आहे. दहा वर्षांत पालिकेचे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करावी अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा म्हात्रे यांनी दिला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून पाइपलाइन टाकली आहे. परंतु नवीन पाइपलाइन टाकल्यानंतर जुने पाइप काढले का, ते कुठे आहेत? अद्याप दिघा व इतर काही परिसरांत पुरेसे पाणी मिळत नाही. स्काडा सिस्टीम सुरू नाही. प्रशासनाने स्काडा सुरू असल्याचे दाखविल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचे आव्हानही त्यांनी दिले.
सभागृह नेते जयवंत सुतार यांनीही शहरातील पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. महापौर सुधाकर सोनावणे यांनीही सर्व नगरसेवकांच्या मतांचा विचार करून प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या.

Web Title: The slogan 'Save the water' in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.