नवी मुंबई : अन्नपूर्णा परिवाराच्या वतीने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे २४ व्या वार्षिक महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दहा हजारांहून अधिक महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या. यावेळी कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देत झोपडपट्टी परिसरातील महिलांना बँकेत खाते उघडण्यासाठी तसेच कॅशलेस व्यवहार करण्यासाठी अन्नपूर्णा परिवाराच्या वतीने मदतीचे आवाहन संस्थापक अध्यक्ष मेधा पुरव यांच्या वतीने करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी अन्नपूर्णा परिवाराच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. वृध्दापकाळासाठी आधारपूर्णा या नव्या योजनेची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. २०१६ मध्ये अन्नपूर्णा परिवाराच्या वतीने महिलांना १३० करोड रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले. आजारपण, शिक्षण आदीबाबतीत गरीब कुटुंबीयांना १.८७ करोड रुपयांचे वितरण करण्यात आले. ८३६ गरीब विद्यार्थ्यांमध्ये २० लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. मेळाव्यात व्यापारी संघाचे नेते आणि लोकगीतकार शाहीर लेखक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मराठी लेखिका मल्लिका अमर शेख यांची विशेष उपस्थिती होती. आदिवासींसाठी लढा देणाऱ्या सुरेखा दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी इंडियन ओवरसीस बँकेचे मुख्य व्यवस्थापक राजीव गलवाणकर, अन्नपूर्णा परिवाराचे विश्वस्त बी.एस.पिसाळ, अनिता सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.मेळाव्यातील घोषणा ८०००० सदस्यांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणाआर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना १५००० रुपयांचे पहिले कर्ज मिळणारपहिले कर्ज २५ हजारांपासून ते १ लाखापर्यंत मिळणारराष्ट्रीय बँकांच्या मदतीने प्रत्येक महिला सदस्यांना बँक खाते उघडून देणारउल्हासनगर आणि पनवेल येथे नवीन शाखा
झोपडपट्टीतील महिलांना बँकेत खाते उघडून देणार
By admin | Published: January 30, 2017 2:17 AM