शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

स्मार्ट सिटीतले सायबर सेल दुर्लक्षितच, तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 4:32 AM

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे. परंतु गुन्हे शाखेला तज्ज्ञ अधिकारी मिळत नसल्याने उपलब्ध अधिका-यांनाच प्रशिक्षण देऊन सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न पोलीस आयुक्तांना करावा लागत आहे.मागील काही वर्षात इंटरनेटच्या वाढत्या बेजबाबदार वापरामुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणा-यांचे प्रमाण वाढू लागले आहे. ईमेलवर अथवा मॅसेजवर आलेली एखादी फसव्या आमिषाच्या लिंकवर सहज विश्वास ठेवला जात आहे. यामुळे स्वत:ची खासगी तसेच बँकेची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचत आहे. तर बँकांकडून ग्राहकांच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डची कसलीही माहिती फोनवर विचारली जात नसतानाही अनोळखी व्यक्तीला ती सांगितली जाते. यावरून नागरिकांमध्ये अद्यापही सायबर गुन्हेगारीविषयी अज्ञानता असल्याचे दिसून येत आहे. परिणामी छोटासा निष्काळजीपणा आॅनलाइन फसवणुकीला कारणीभूत ठरत आहे. अशा प्रकारातून नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात गतवर्षी आॅनलाइन फसवणुकीच्या ७५ तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये डेबिट अथवा क्रेडिट कार्डमधून पैसे काढल्याच्या १५, सोशल मीडियातून बदनामी तसेच फसवणुकीच्या २३, नोकरीच्या आमिषाने लुबाडल्याच्या ८ व इतर प्रकारच्या २१ तक्रारी आहेत. त्यापैकी अवघ्या २७ गुन्ह्यांची उकल होवू शकलेली आहे.बहुतांश गुन्ह्यांमध्ये नागरिकांना फसवण्यासाठी वापरण्यात आलेले सिमकार्ड परराज्यातील अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले जाते. तर ठरावीक कालावधीनंतर ते बंद केले जात असल्याने पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहचता येत नाही. तर नेटद्वारे केल्या जाणाºया गुन्ह्यात सराईत हॅकर्सचा सहभाग असल्याने बनावट आयपीच्या आधारे जगभरातून कुठूनही ते गुन्हेगारी कृत्य करतात. अशा प्रकारे जेएनपीटीचे एक बंदर, वाशीतले रुग्णालय तसेच नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ यावर देखील हॅकर्सने हल्ला केलेला आहे. त्यांच्यापर्यंतही पोहचणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. शहराची भविष्याची वाटचाल पाहता अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासह त्यांचा उलगडा करणारी यंत्रणा पोलिसांकडे असण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षात शहरातील आयटी पार्कमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर रहिवासी लोकसंख्येत वाढ होवू लागल्याने शहराचाही विस्तार वाढत आहे. यामुळे पुढील पाच ते दहा वर्षात लूट, दरोडे यापेक्षा घरबसल्या आॅनलाइन लुटीचे अथवा फसवणुकीचे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तज्ज्ञ अधिकाºयांची कमतरता असल्याने भविष्यात सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान निर्माण होवू शकते. याकडे आजवरच्या आयुक्तांकडून फारसे लक्ष देण्यात आलेले नसल्याचेही दिसून येत आहे. मात्र विद्यमान आयुक्त संजय कुमार यांनी सायबर गुन्ह्यांची गतवर्षातली आकडेवारी लक्षात घेवून सध्याच्या परिस्थितीत सुधार घडवण्यावर भर दिला आहे. त्याकरिता गुन्हे शाखेकडे उपलब्ध अधिकाºयांना विशेष प्रशिक्षण देवून सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबई