दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड, कचऱ्याच्या ढिगातून नंदनवन, ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ बनले नवे पर्यटन केंद्र
By नामदेव मोरे | Published: January 31, 2023 08:50 AM2023-01-31T08:50:22+5:302023-01-31T08:51:04+5:30
Navi Mumbai: नेरूळमधील एकेकाळचा दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड व कचऱ्याचे ढिगारे असलेल्या परिसरात महानगरपालिकेने ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ नावाचे नंदनवन फुलविले आहे. १३७ एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : नेरूळमधील एकेकाळचा दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड व कचऱ्याचे ढिगारे असलेल्या परिसरात महानगरपालिकेने ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ नावाचे नंदनवन फुलविले आहे. १३७ एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला आहे. अडीच किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, ३५ एकरावरील १ लाख वृक्ष असलेले देशातील सर्वात मोठे मियावाकी जंगल उभारले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी देशात प्रसिद्ध आहे. शहरातील अनेक प्रकल्प देशातील इतर महानगरपालिकांसाठी अनुकरणीय ठरले आहेत. स्वच्छता अभियानात देशपातळीवर ठसा उमटविताना टाकाऊमधून टिकाऊ या संकल्पनेतून अनेक शिल्प साकारली आहेत. त्याच धर्तीवर शहरातील दुर्लक्षित ठिकाणांचे पर्यटनस्थळामध्ये रुपांतर करण्यासही प्राधान्य दिले आहे. यामध्ये नेरूळमधील ज्वेल ऑफ नवी मुंबईचाही समावेश आहे. पामबीच रोडला लागून असलेल्या होल्डिंग पाँडचा परिसरात नेहमी दुर्गंधी पसरलेली असायची.
१ लाख वृक्षांचे मियावाकी जंगल
सद्यस्थितीमध्ये येथे ६४ एकरावर मूळचा होल्डिंग पाँड आहे. ८ एकरावर छोटा नैसर्गिक तलाव, १५ एकरावर वॉक वे, सायकल ट्रॅक, ६ एकरावर मँग्रोज व तब्बल ३५ एकरांवर देशातील सर्वात मोठे मियावाकी स्वरूपाचे जंगल असून तेथे तब्बल १ लाख वृक्ष लावली आहेत.
महानगरपालिकेने पाच टप्प्यांत केला विकास
जॉगिंग ट्रॅक, ज्वेलची प्रतिकृती, थिंकरची प्रतिकृती, वाहनतळ विकसित केले.
स्मृतिवन, अमृतवन विकसित केले.
होल्डिंग पाँड, वॉक वे, ॲम्फी थिएटरचा विकास केला.
मेडिटेशन कॉर्नर, सायकल ट्रॅक विकसित करण्याचे काम सुरू आहे.
कारंजे, यांत्रिक गेट व इतर कामे केली जाणार आहेत. टाकाऊ
फ्लेमिगोंची प्रतिकृती
वस्तूंमधून तयार केलेली फ्लेमिगोंची प्रतिकृतीही लक्ष वेधत आहे. एका दुर्लक्षित परिसराचे नवी मुंबईमधील सर्वोत्तम पर्यटनस्थळामध्ये रूपांतर करण्यात महानगरपालिकेला यश आले आहे.
पालिका आयुक्तांचे नियोजन
‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ विकसित करण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही या परिसराच्या विकासाचे सूक्ष्म नियोजन केले असून प्रत्येक काम दर्जेदार पद्धतीने होईल याकडे लक्ष दिले आहे. भविष्यात मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यावर लक्ष दिले जात आहे.
क्षेत्रफळ चौरस मीटर
२,५८,९९९
होल्डिंग पाँड
१,४२,६५१
मियावाकी जंगल
६३,७३८
वॉक वे, सायकल ट्रॅक
३३,५८८
लहान तलाव
३१,६८६
टेर्टरी वॉटर बॉडी
२,७७२
मँग्रोज