शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड, कचऱ्याच्या ढिगातून नंदनवन, ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ बनले नवे पर्यटन केंद्र

By नामदेव मोरे | Published: January 31, 2023 8:50 AM

Navi Mumbai: नेरूळमधील एकेकाळचा दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड व कचऱ्याचे ढिगारे असलेल्या परिसरात महानगरपालिकेने ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ नावाचे नंदनवन फुलविले आहे. १३७ एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : नेरूळमधील एकेकाळचा दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड व कचऱ्याचे ढिगारे असलेल्या परिसरात महानगरपालिकेने ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ नावाचे नंदनवन फुलविले आहे. १३७ एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला आहे. अडीच किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, ३५ एकरावरील १ लाख वृक्ष असलेले देशातील सर्वात मोठे मियावाकी जंगल उभारले आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी देशात प्रसिद्ध आहे. शहरातील अनेक प्रकल्प देशातील इतर महानगरपालिकांसाठी अनुकरणीय ठरले आहेत. स्वच्छता अभियानात देशपातळीवर ठसा उमटविताना टाकाऊमधून टिकाऊ या संकल्पनेतून अनेक शिल्प साकारली आहेत. त्याच धर्तीवर शहरातील दुर्लक्षित ठिकाणांचे पर्यटनस्थळामध्ये रुपांतर करण्यासही प्राधान्य दिले आहे. यामध्ये नेरूळमधील ज्वेल ऑफ नवी मुंबईचाही समावेश आहे. पामबीच रोडला लागून असलेल्या होल्डिंग पाँडचा परिसरात नेहमी दुर्गंधी पसरलेली असायची. 

१ लाख वृक्षांचे मियावाकी जंगलसद्यस्थितीमध्ये येथे ६४ एकरावर मूळचा होल्डिंग पाँड आहे. ८ एकरावर छोटा नैसर्गिक तलाव, १५ एकरावर वॉक वे, सायकल ट्रॅक, ६ एकरावर मँग्रोज व तब्बल ३५ एकरांवर देशातील सर्वात मोठे मियावाकी स्वरूपाचे जंगल असून तेथे तब्बल १ लाख वृक्ष लावली आहेत.

महानगरपालिकेने पाच टप्प्यांत केला विकास जॉगिंग ट्रॅक, ज्वेलची प्रतिकृती, थिंकरची प्रतिकृती, वाहनतळ विकसित केले.स्मृतिवन, अमृतवन विकसित केले. होल्डिंग पाँड, वॉक वे, ॲम्फी थिएटरचा विकास केला. मेडिटेशन कॉर्नर, सायकल ट्रॅक विकसित करण्याचे काम सुरू आहे. कारंजे, यांत्रिक गेट व इतर कामे केली जाणार आहेत. टाकाऊ 

फ्लेमिगोंची प्रतिकृतीवस्तूंमधून तयार केलेली फ्लेमिगोंची प्रतिकृतीही लक्ष वेधत आहे. एका दुर्लक्षित परिसराचे नवी मुंबईमधील सर्वोत्तम पर्यटनस्थळामध्ये रूपांतर करण्यात महानगरपालिकेला यश आले आहे.

पालिका आयुक्तांचे नियोजन‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ विकसित करण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही या परिसराच्या विकासाचे सूक्ष्म नियोजन केले असून प्रत्येक काम दर्जेदार पद्धतीने होईल याकडे लक्ष दिले आहे. भविष्यात मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यावर लक्ष दिले जात आहे. 

क्षेत्रफळ चौरस मीटर२,५८,९९९ होल्डिंग पाँड १,४२,६५१ मियावाकी जंगल ६३,७३८ वॉक वे, सायकल ट्रॅक ३३,५८८लहान तलाव ३१,६८६टेर्टरी वॉटर बॉडी २,७७२ मँग्रोज 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई