सापाची सुटका... घराच्या छतावर निघाला दुर्मिळ उडता 'सोन सर्प'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 11:32 PM2021-08-05T23:32:18+5:302021-08-05T23:33:28+5:30
डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छताखाली असलेल्या गोल पाईपात दुर्मिळ उडता सोन सर्प दिसला. अमोल देशमुख यांनी दूरध्वनीवरुन सपंर्क साधुन उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना बोलावले.
मधुकर ठाकूर
उरण : डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छतावर दुर्मिळ उडता सोन सर्प (Ornate flying snake) आढळला आहे. उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी या दुर्मिळ सापाला पकडून वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जंगलात सोडून दिले आहे.
डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छताखाली असलेल्या गोल पाईपात दुर्मिळ उडता सोन सर्प दिसला. अमोल देशमुख यांनी दूरध्वनीवरुन सपंर्क साधुन उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना बोलावले. संस्थेचे अध्यक्ष आनंद मढवी, सदस्य विवेक केणी, पंकज घरत, काशिनाथ खारपाटील, मयूर मढवी, राजाराम कडू, बाळा कोळी, रुपेश भोईर, नितीन मढवी, विनीत मढवी, निखिल कोळी, रमेश फोफेरकर, पीयूष लोंगळे, दिलीप मढवी, अजय पाटील,सूचित मढवी, प्रदीप भोनगे, कैलास शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुर्मिळ सोन सर्पाला मोठ्या शिताफीने पकडले.वनरक्षक तेजस नरे, पी.बी.कराडे, विकास राजपूत यांच्या उपस्थितीत कोंबर डोंगरात सुरक्षितपणे सोडून दिल्याची माहिती आनंद मढवी यांनी दिली.
उडता सोन सर्प (Ornate flying snake ) हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा कोलब्रिड प्रकारातील दुर्मिळ साप आहे. क्रायसोपेलीया वंशाच्या इतर प्रजातींसह, अतिशय असामान्य आहे. कारण ते एक प्रकारचे ग्लाइडिंग फ्लाइट करण्यास सक्षम आहे. हे मागील बाजूस देखील आहे.
सर्पमित्र ---आनंद मढवी