टेकडीचे सपाटीकरण : उलवेतील ब्लास्टिंगमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:39 AM2018-01-08T02:39:19+5:302018-01-08T02:39:25+5:30

नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी उलवा टेकडीचे सपाटीकरणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घडविले जात असून स्थानिकांच्या जीवावर हे ब्लास्टिंग बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 Snowplighting: Upleta Blasting Survivors | टेकडीचे सपाटीकरण : उलवेतील ब्लास्टिंगमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला

टेकडीचे सपाटीकरण : उलवेतील ब्लास्टिंगमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला

Next

वैभव गायकर
पनवेल : नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी उलवा टेकडीचे सपाटीकरणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घडविले जात असून स्थानिकांच्या जीवावर हे ब्लास्टिंग बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी ब्लास्टिंगमुळे उडालेल्या दगडांमुळे येथील सिद्धार्थनगरमधील रहिवासी व ब्लास्टिंगचे काम करणारे अभियंते, कामगार गंभीर जखमी झाल्याने या गावांचा पुनर्वसनाचा मुद्दा पुढे आला आहे.
ब्लास्टिंगमुळे प्रकल्पबाधित गावातल्या घरांना मोठे हादरे बसत आहेत. वारंवार ब्लास्टिंगमुळे येथील ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून सिडकोने प्रथम ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चार दिवसांपूर्वी वरचा ओवळा ग्रामस्थांनी सिडकोच्या निषेधार्थ ब्लास्टिंगच्या ठिकाणी मोर्चा काढून काम बंद पाडले होते. घरांना बसणाºया रोजच्या हादºयांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. यावेळी स्वत: सिडको अधिकाºयांनी यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चात आमदार बाळाराम पाटील यांनी लोकांचे जीव गेल्यावर तुम्हाला जाग येणार का? अशा स्पष्ट शब्दात सिडको अधिकाºयांना सुनावले. आमदार बाळाराम पाटील यांच्या याच शब्दाची आठवण शनिवारी घडलेला घटनेने झाली. घटनेत पाच कामगार व सिद्धार्थनगरमधील रहिवासी जखमी झाले असून याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
विमानतळबाधित गावांमध्ये दहा गावांचा समावेश आहे. चिंचपाडा, कोपर,कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे, उलवा अशी या दहा गावांची नावे आहेत. याठिकाणी सुरू असलेल्या ब्लास्टिंगच्या विरोधात या गावातील रहिवाशांनी वारंवार मोर्चे, आंदोलने, कामबंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सिडकोला अनेक निवेदने देऊन देखील सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
आमदार बाळाराम पाटील यांनी याठिकाणी घडविल्या जाणाºया स्फोटामुळे स्थानिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट शब्दात सिडको अधिकाºयांना सांगितले होते. लोकांचे जीव गेल्यावर सिडको अधिकाºयांना जाग येईल का? अशी संतप्त भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली होती. मात्र, शनिवारी झालेल्या ब्लास्टिंगच्या घटनेत आमदार बाळाराम पाटील यांच्या शब्दाची आठवण नक्कीच सिडको अधिकाºयांना झाली असेल. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले, मात्र सुदैवाने अनेकांच्या जीविताचा धोका टळला.
दहा गाव संघर्ष समितीची आधी पुनर्वसनची मागणी
विमानतळबाधित दहा गावांच्या मिळून स्थापन झालेल्या संघर्ष समितीने शनिवारी घडलेल्या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्या सोडवून आधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा त्यानंतर काम सुरु करा, अशी भूमिका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पबाधित दहा गाव संघर्ष समितीने घेतली आहे. सोमवारी सिडकोला कामबंद ठेवण्यासाठी निवेदन देणार आहोत. सिडकोने चार दिवसांत यासंदर्भात निर्णय न घेतल्यास मोठे आंदोलन पुकारणार असल्याचे समितीचे अध्यक्ष नाथा पाटील यांनी सांगितले.
आमदार बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र -
प्रकल्पग्रस्तांचे योग्य ते पुनर्वसन व पुन:स्थापना न करता विमानतळ प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आलेली आहेत. सदर कामे करताना गावाशेजारी जीवघेणे स्फोट घडवून आणले जात असल्याने स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विमानतळाची सर्व कामे थांबविण्याची विनंती अचलपूर विधानसभेचे आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी २९ डिसेंबर २0१७ रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली होती. मात्र या पत्राची कोणतीच दखल राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आली नाही.

Web Title:  Snowplighting: Upleta Blasting Survivors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.