शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सामाजिक संदेश देणारे चित्ररथ ठरले आकर्षण

By admin | Published: March 29, 2017 5:08 AM

नेरळ येथील नववर्ष शोभायात्रेचे उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी

 कर्जत : नेरळ येथील नववर्ष शोभायात्रेचे उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काढलेल्या या मिरवणुकीत सामाजिक आशय असणारे चित्ररथ नेरळकरांचे लक्ष वेधून घेत होते.नेरळमधील हेटकरआळीतील श्री गणेश मंदिरातून नववर्ष स्वागत यात्रेला सुरु वात झाली. त्याचवेळी पूर्व भागातून जयदीप क्र ीडा मंडळाने नववर्ष स्वागत यात्रा एसटी स्टॅन्ड येथून काढली. नेरळ गणेश मंदिर येथून निघालेली शोभायात्रा हेटकरआळी, टेपआळी, महेश चित्रमंदिर अशी आली. त्या वेळी पूर्व भागातून निघालेली शोभायात्रा देखील तेथे पोहचली. त्यानंतर भव्य शोभायात्रा हुतात्मा हिराजी पाटील चौकातून माथेरान-नेरळ रस्त्याने शिवाजी महाराज चौकात पोहचली. शोभायात्रेत पालखी, बैलगाडी रथ आदींसह अश्वारूढ झालेले बाल मावळे देखील होते. अखंड हरिनामाचा जयघोष करणारे वारकरी आणि लेझीमच्या तालावर फेर घेणाऱ्या महिला, तरु णी लक्ष वेधून घेत होत्या.महापुरु षांच्या वेशभूषानेरळ : कर्जत तालुक्यातील पोशीरमध्ये गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोशीरमधील सत्यमेव जयते ग्रुप, वारकरी सांप्रदाय आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपूर्ण गावात शोभायात्रा काढण्यात आली. च्शोभायात्रेत महापुरु षांच्या वेशभूषा साकारून जुन्या परंपरा, आठवणींना उजाळा, महिलांसाठी होममिनिस्टर कार्यक्र म आदी कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.च्पोशीरमध्ये सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात आली होती. लेझीम, ढोल- ताशे, भजन, हरिपाठ आणि महापुरु षांच्या वेशभूषा साकारु न जुन्या परंपरा, आठवणींना उजाळा दिला.च्या वेळी सत्यमेव जयते ग्रुपचे सर्व सदस्य, वारकरी सांप्रदाय, ग्रामस्थ सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात साजरा केला गुढीपाडवाकार्लेखिंड : झेविअर इन्स्टिट्यूट आॅफ कम्युनिकेशन, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी श्री समर्थ वृद्धाश्रम, परहुर येथे भेट देऊन गुढीपाडवा साजरा केला. अलिबाग तालुक्यातील परहुर या गावातील जयेंद्र गुंजाळ यांनी श्री समर्थ वृध्दाश्रम २००० साली चालू केला. सुरुवातीला त्यांनी घरातच वृध्दाश्रम चालू केला. आजमितीला ते निराधार वयोवृध्दांची सेवा करत आहेत. या आश्रमात रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, तसेच महाराष्ट्राबाहेरचे वृध्द आहेत. २९ लोक या आश्रमात आपले उरलेले आयुष्य आनंदात जगत आहेत. ग्रामीण भागात असलेल्या आणि मोलाची सेवा करणाऱ्या वृध्दाश्रमाकडे मुंबई येथील झेविअर इन्स्टिट्यूड आॅफ कम्युनिकेशन या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळाली या हेतूने वृध्दाश्रमास भेट दिली. नेरळमध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्र मनेरळ : कर्जत तालुक्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करून अनेकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नेरळमधील साईमंदिर परिसरातील परिवार रहिवासी महासंघाने नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. परिसरात महिला सक्षमीकरण कार्यक्र म आणि हळदीकुंकू कार्यक्र म राबवून गुढीपाडवा साजरा केला.नेरळमधील रहिवासी महासंघ वर्षभर अनेक कार्यक्र म राबवत असतात. रहिवासी महासंघ हा सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करत आहे. त्यांच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर ११ वाजता महिला सक्षमीकरण कार्यक्र म पार पडला. ‘बेटी बचाओ’चा संदेशब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या पथकाने स्त्री भ्रूणहत्या या सामाजिक जाणिवेचे वास्तव प्रदर्शन करणारी चलचित्रे शोभायात्रेत सहभागी झाली होती. जयदीप मंडळाने मुलगी जगली पाहिजे, स्त्रियांचे कुटुंबासाठी योगदान आणि त्यांचे स्थान यावर कटाक्ष टाकणारे फलक नेरळकरांचे लक्ष वेधून घेत होते. नेरळमधील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांची आणि प्रामुख्याने तरु णांची मोठी उपस्थिती शोभायात्रेत होती. कर्जतमध्ये नवववर्ष स्वागत यात्राकर्जत : मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त श्री कपालेश्वर देवस्थानच्या वतीने कर्जतमध्ये मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री कपालेश्वर मंदिराच्या येथून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत देवस्थान समितीचे पद्माकर गांगल, ज्ञानेश्वर तिवाटणे, लीला चंदन, संदीप भोईर, अभिजित मराठे आदींसह कल्पना दास्ताने, नगरसेविका सुवर्णा जोशी, मालती साने, भारती म्हसे, शर्वरी कांबळे, वैदेही पुरोहित आदी उपस्थित होते.शिशुमंदिरात नववर्षाचे स्वागतकर्जत : गुढी उभारू मांगल्याची, चैतन्याची, यश, कीर्ती आणि समृद्धीची असा संदेश देत मंगळवारी कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशुमंदिर शाळेतील सर्व शिक्षिकांनी मिळून शाळेत गुढ्या उभ्या करून हा सण साजरा केला. आपल्या भारतीय सौर वर्षाचे स्वागत अनोख्या पध्दतीने केले.मुख्याध्यापिका उमा डोंगरे यांनी सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगूत यातूनच आपल्या संस्कृतीचे जतन होईल असे सांगितले.