सामाजिक संघटनांनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:27 AM2018-03-27T01:27:00+5:302018-03-27T01:27:00+5:30

पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपाने आणलेला अविश्वास ठराव हा प्रामाणिक अधिकाऱ्यावरील अन्याय आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक

Social organizations have taken a pledge of opposition leaders | सामाजिक संघटनांनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट

सामाजिक संघटनांनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट

Next

पनवेल : पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपाने आणलेला अविश्वास ठराव हा प्रामाणिक अधिकाऱ्यावरील अन्याय आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक अधिकाºयांच्या मागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. याकरिता पनवेलमधील संघटनांच्या पदाधिकाºयांनी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांच्या दि. २७ रोजी भेटी घेऊन हा विषय सभागृहात चर्चेला आणण्याची विनंती केली.
पनवेल महानगर पालिकेत सत्ताधारी भाजपाने सत्तेचा गैरवापर करीत आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणल्याचा आरोप करीत सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांची बदली मुख्यमंत्र्यांनी थांबवावी याकरिता दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना निवेदन देण्यात आले. या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात कांतीलाल कडू, कॅप्टन कलावत, कीर्ती मेहरा, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवाड आदींचा समावेश होता. केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता असल्याने त्यांना सत्तेचा माज आला आहे. आयुक्तांविषयी सामाजिक संस्थांची जाणीव प्रगल्भ आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार करणाºया प्रामाणिक अधिकाºयांच्या बाजूने जनतेने ठामपणे उभे राहिले पाहिजे. हा विषय विधानपरिषदेत उपस्थित करणार असल्याचे आश्वासन यावेळी धनंजय मुंडे यांनी शिष्टमंडळाला दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तत्काळ पत्र लिहून शिंदे यांची मुदतपूर्व बदली करू नये अशी विनंती करण्यात येणार असल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. आयुक्तांच्या अविश्वास ठरावा विरोधात विविध संघटना एकवटल्या आहेत.

Web Title: Social organizations have taken a pledge of opposition leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.