कळंबोली : नवीन पनवेल, खांदा वसाहतीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेले देखावे पाहण्याकरिता गर्दी जमू लागली आहे. पावसाचा व्यत्यय होत असला, तरी गणेशभक्त गणरायाच्या दर्शनाकरिता बाहेर पडत आहेत. दोनही वसाहतीत पौराणिक, सामाजिक विषयांवर देखावे साकारण्यात आले आहेत. त्याचबरोबर मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याबाबत प्रबोधन करण्यात आले आहे.नवीन पनवेल नोडमध्ये एकूण ४२ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यापैकी सात आणि बारा दिवसांचे प्रत्येकी १८ गणराय आहेत. नवीन पनवेल सेक्टर १५ येथील विघ्नहर्ता मित्रमंडळाचे यंदा तेरावे वर्ष आहे. सात दिवसांच्या गणपतीसमोर मैदानी खेळांवर प्रकाश टाकणारा देखावा तयार केला आहे. मैदानी खेळांचे विविध फोटो त्या ठिकाणी लावून, लहान मुलांना याकरिता प्रोत्साहन देण्याचे आवाहन पालकांना एक प्रकारे करण्यात आले आहे. त्याचबरोबर गेमच्या चक्रव्यूहापासून आपल्या पाल्यांना दूर ठेवण्याचा संदेशही देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संजय कोलगे यांनी दिली. शशिकांत लोखंडे, राहुल कदम, शोभीत नेरकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. ओमसाई कला मित्रमंडळ, बाल मित्रमंडळ पोदीचे अध्यक्ष भरत भुजबळ यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. श्रीगणेश मित्रमंडळ, शिवश्री, सिद्धार्थ या मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता भाविक गर्दी करू लागले आहेत. खांदा वसाहतीत मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला ओम साई खांदेश्वर महिला व बाल मित्रमंडळाच्या खांदेश्वरच्या राजासमोर गोवर्धन पर्वत चलचित्राच्या माध्यमातून साकारला आहे. नगरसेविका सीता सदानंद पाटील अध्यक्ष असलेल्या या मंडळाने बाहेर, त्याचबरोबर प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्र ीनवर स्त्री भू्रणहत्या, नारी सन्मान, शेतकºयांच्या आत्महत्या, दुष्काळ, वृक्षसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान याविषयांवर प्रकाश टाकला आहे. तसेच कचºयाचे वर्गीकरण, रुग्णवाहिकेला वाट देऊन रुग्णांचा जीव वाचवणे, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर पोस्टर्स लावले आहेत.याच वसाहतीत संजय भोपी प्रतिष्ठान पुरस्कृत श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या महागणपती दर्शनाकरिता भाविक येत आहेत. मंडळाने गावाचा देखावा तयार केला आहे. त्यामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा, सार्वजनिक स्वच्छतागृह, शाळा, मैदान, ग्रामीण घरांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. यामाध्यमातून शहरवासीयांना आपल्या गावची आठवण करून दिली आहे.रायगडच्या राजासमोर अवतरले साईबाबाखांदा वसाहतीतील ओंकार मित्रमंडळाची रायगड जिल्ह्यात सर्वात मोठी गणपती मूर्ती असते. यावर्षी रायगडच्या राजाची मूर्ती २२ फूट उंच आहे. सुभाष सावर्डेकर यांनी स्थापन केलेल्या या मंडळाचे यंदा पंधरावे वर्ष आहे. त्यांनी साईबाबांचे चलचित्र साकारले आहे.विचुंबे गावात ‘एक गाव, एक गणपती’विचुंबे गावात गेल्या ५९ वर्षांपासून सुरू असलेली ‘एक गाव, एक गणपती’ ही पंरपरा यंदाही कायम दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने बारा दिवस सामाजिक आणि धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे.
देखाव्यांमध्ये सामाजिक विषय; चलचित्रांना पसंती, भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 2:02 AM