नवी मुंबई : महापालिकेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापूरच्या विजय गुटाळने महापौर केसरीचा किताब पटकावला. त्याने कोल्हापूरच्या सचिन जमादारवर मात केली. लातूरच्या देवानंद पवारने युवा चषकचा बहुमान मिळविला.कोपरखैरणे सेक्टर ८ मधील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. राज्यातून २७८ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. महापौर चषकसाठी सोलापूरचा विजय गुटाळ व कोल्हापूरचा सचिन जमादार यांच्यामध्ये लढत झाली. गुटाळने जमादारवर मात करून महापौर केसरीचा किताब पटकावला. त्याला १ लाख रुपये रोख व गदा देऊन सन्मानित करण्यात आले.महापौर जयवंत सुतार यांनी सर्व विजेत्यांचे व सहभागी खेळाडूंचे कौतुक केले. नवी मुंबई महापालिकेने सानपाडा येथे कुस्तीचा आखाडा उभा केला असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही सुतार यांनी स्पष्ट केले.या वेळी सभागृहनेते रवींद्र इथापे, प्रदीप गवस, क्रीडा समिती सभापती विशाल डोळस, रमेश डोळे, गणेश म्हात्रे, शंकर मोरे, लता मढवी, कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, सुरेश पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गवस व इतर पदाधिकारी उपस्थित होते.विजेत्यांची नावेमहापौर केसरी गटविजय गुटाळ, सचिन जमादार, आनंद यादव, कृष्णा शेळके,६५ ते ७३ वजनी गटस्वप्निल पाटील, धर्मा शिंदे, भगतसिंग खोत, प्रदीप पाटील४६ ते ५० किलो वजनी गटसुदर्शन पाटील, अनिकेत मढवी, अनिल पाटील, आकाश चव्हाण५५ ते ६५किलो वजनी गटदेवानंद पवार, सद्दाम शेख, अतिश अवाले, कल्पेश पाटील३२ ते ४० वजनी गटगौरव भोसले, ओमकार पाटील, सुमित सावंत, विघ्नेश्वर मेढकरमहिला गट (४५ ते ५४ किलो)स्मिता पाटील, प्रगती ठोंबरे, कोमल देसाई, राधा पाटीलमहिला गट (५५ ते ६५ किलो)विश्रांती पाटील, मनाली जाधव, भाग्यश्री भोईर, समृद्धी भोसले
सोलापूरचा विजय गुटाळ महापौर केसरीचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:06 AM