नवी मुंबई : दैनंदिन घनकचºयावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती व बांधकामासाठी वापरल्या जाणा-या विटा तयार करण्याच्या प्रस्तावावर महापालिका विचार करीत आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली आहे. कचरामुक्त नवी मुंबई या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची योजना त्यांनी महापालिका व सिडकोसमोर मांडली आहे.नवी मुंबई शहरात गोळा होणाºया दैनंदिन घनकच-याची तुर्भे येथील क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. महापालिकेच्या पर्यावरण अहवालातील नोंदीनुसार २0१६-१७ मध्ये या क्षेपणभूमीवर ७२५ मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यावरून शहरात दिवसाला निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण लक्षात येते. दैनंदिन घनकचºयामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातून येणाºया असहय्य दुर्गंधीमुळे श्वसनाचे आजार उद्भवत आहेत. यावर उपाय म्हणून नवी मुंबई शहराला कचरामुक्त करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेतला असून कचºयापासून वीजनिर्मिती आणि बांधकामासाठी विटा तयार करण्याची योजना त्यांनी मांडली आहे. ग्रीन टेक्नॉलॉजी न्यूवे ही कंपनी या क्षेत्रात कार्य करीत आहे. घनकचºयापासून विटा व वीजनिर्मितीसाठी या कंपनीकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. बुधवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी या कंपनीचे संचालक डॉ. शिवकुमारन यांच्यासोबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आणि महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर यांची भेट घेतली होती. यावेळी कंपनीच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीसह सिडको आणि महापालिकेच्या अधिकाºयांनी क्षेपणभूमीचा दौरा करून कामाचा ढोबळ आढावा घेतला होता. अलीकडेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अयप्पन, संचालक डॉ. शिवकुमारन, के. भालचंद्रन यांची आमदार मंदा म्हात्रे यांच्यासोबत यासंदर्भात एक बैठक पार पडली. दरम्यान, या घनकचºयापासून वीजनिर्मिती आणि विटा तयार करण्याच्या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास महापालिका आणि सिडकोने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आ. मंदा म्हात्रे यांनी दिली.
घनकच-यापासून वीट, वीजनिर्मितीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:28 AM