वीजसमस्या सोडविण्यासाठी ‘महावितरण आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:33 AM2017-07-22T03:33:10+5:302017-07-22T03:33:10+5:30

पनवेल तालुक्यातील नागरिकांना महावितरणच्या समस्येतून सोडविण्यासाठी महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ म्हणजेच ग्राहक मेळावा हा उपक्र म सुरू केला आहे.

To solve the problem of electricity, | वीजसमस्या सोडविण्यासाठी ‘महावितरण आपल्या दारी’

वीजसमस्या सोडविण्यासाठी ‘महावितरण आपल्या दारी’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल तालुक्यातील नागरिकांना महावितरणच्या समस्येतून सोडविण्यासाठी महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ म्हणजेच ग्राहक मेळावा हा उपक्र म सुरू केला आहे.
ग्रामीण भागातील ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महावितरणने गेल्या आठवड्यापासून हा उपक्रम सुरू करण्याचा
निर्णय घेतला आहे. उपक्र माला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वामी विवेक यांनी दिली.
महावितरणचे ग्रामीण भागात हजारो ग्राहक आहेत. त्यांना शेकडो समस्या आहेत. आवश्यकतेनुसार वीजयंत्रणेची दुरु स्ती अभियान, वीज ग्राहकांच्या तक्र ारींनुसार देयक दुरु स्ती, वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यास महावितरण कटिबद्ध असल्याचे, सांगत या उपक्र माची सुरु वात करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात नागरिकांना आजही विजेच्या लपंडावाच्या समस्या भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसतात. वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी महावितरणतर्फे तालुक्यातील न्हावा, करंजाडे नोड व करंजाडे गाव येथे हा उपक्र म राबविण्यात आला आहे. उपक्र मांमध्ये शेकडो नागरिकांनी तक्र ारी
नोंदविल्या आहेत. असे ग्राहक
मेळावे पनवेल तालुक्यातील
ग्रामीण भागामध्ये भरविण्यात
येणार आहेत. तरी या मेळाव्यात सामील होऊन आपल्या तक्रारी मांडण्याचे आवाहन पनवेल
ग्रामीण उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वामी विवेक यांनी केले आहे.

Web Title: To solve the problem of electricity,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.