- वैभव गायकर पनवेल : महापालिका आणि सिडको दरम्यान घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात सुरू असलेला वाद शहरवासीयांच्या मुळावर बेतला आहे. महापालिका क्षेत्रात सिडकोच्या अखत्यारीत असलेला ७0 टक्के भाग येतो. या भागात सिडकोच्या माध्यमातून घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते. परंतु विविध कारणांमुळे या कामात अनियमितता आली आहे. याचा परिणाम म्हणून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न जटील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तळोजा एमआयडीसीत चाल परिसरात सुमारे ३५ एकरच्या क्षेत्रात सिडकोच्या माध्यमातून डंपिंग ग्राउंड उभारण्यात आले आहे. २00७ सालापासून हे डंपिग ग्राउंड कार्यान्वित आहे. डंपिंग ग्राउंडच्या स्थापनेपासून येथील स्थानिक ग्रामस्थांनी या डंपिंगला विरोध दर्शविला आहे. यामध्ये घोट गाव, करवले, भोईरवाड, कोयनावेले, नितळस या गावांसह ठाणे जिल्ह्यातील उसाटणे, बुर्दूल या गावांचा देखील विरोध आहे. सततच्या दुर्गंधीयुक्त वास तसेच आरोग्यावरील घातक परिणाम यांच्यामुळे ग्रामस्थांनी हा विरोध दर्शविला आहे.या डंपिंगला सर्वपक्षीय विरोध असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्री वामनबाबा संघर्ष समितीमार्फत लढा उभारला आहे. याव्यतिरिक्त डंपिंग ग्राउंडमध्ये प्रक्रि या झालेले दूषित पाणी येथील शेतजमिनीत जात असल्याने देखील येथील शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात पूर्वाश्रमीची पनवेल नगरपरिषद व २३ ग्रामपंचायतींचा परिसर वगळून खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा या सिडको नोडमधील कचरा सिडकोमार्फत उचलला जातो. पनवेल महानगर पालिका क्षेत्रातून दररोज ४५५ ते ४६0 टन कचरा दररोज गोळा केला जातो. यामध्ये सुमारे ३८0 टन हा कचरा सिडको नोडमधील आहे.शहरातील १00 पेक्षा जास्त गृहनिर्माण सोसायट्यांना कचºयाचे वर्गीकरण करणेसंदर्भात महापालिकेने सूचना केल्या आहेत. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात कचरा व्यवस्थापनाची सेवा हस्तांतरण करणार आहे. त्यानंतर पालिका सिडको डम्पिंग ग्राउंडवर कचºयाची विल्हेवाट लावेल. प्रक्रि या करण्याचे काम सिडकोच करेल. त्याचा सिडकोला मोबदला दिला जाईल. डम्पिंग ग्राउंडची क्षमता दोन वर्षांत संपणार आहे. त्यामुळे सिडकोने भूखंड द्यावा, अशा आशयाचा करार केला जाणार असल्याची माहिती पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.>सिडको कार्यक्षेत्रात समस्या गंभीरखारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेलमध्ये सिडको नियुक्त कंत्राटदारांच्या माध्यमातून दैनंदिन कचºयाची विल्हेवाट लावली जाते, परंतु विविध कारणांमुळे हे काम योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पाहायला मिळतात.घनकचरा व्यवस्थापन पालिकेकडे हस्तांतरण झाल्यावरच कचºयाचा हा प्रश्न निकाली निघेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न जटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 2:47 AM