शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लवकरच सुशोभीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 11:50 PM2019-03-03T23:50:25+5:302019-03-03T23:50:31+5:30

पनवेल शहर महापालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे.

Soon after Shivaji Maharaj's statue of beautification | शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लवकरच सुशोभीकरण

शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लवकरच सुशोभीकरण

Next

पनवेल : पनवेल शहर महापालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. दीड कोटी खर्चून महाराजांच्या पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर सुशोभित केला जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या संदर्भात पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. स्वखर्चाने तयार केलेली पुतळ्याची कलाकृती (डिझाइन) आयुक्तांना या वेळी सादर करण्यात आली होती. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर या संदर्भात निविदा तयार करण्यात आली. स्थायी समिती समोर हा विषय आल्यानंतर एका कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
पनवेल शहरात महाराजांचा अश्वारूढ पुतळा सध्याच्या घडीला दिमाखात उभा आहे. शहरातील वाहतूक शाखेच्या चौकीलगत शिवाजी चौकात हा अश्वारूढ पुतळा १९८६-८७ मध्ये उभारण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठिकाणाबाबत कोणतेही सूचनाफलक या परिसरात लावण्यात आलेले नाहीत. पनवेल शहर हे ऐतिहासिक शहर आहे. या संदर्भात ठिकठिकाणी तशा प्रकारच्या नोंदी सापडतात. मात्र, अशा वेळी राज्याचे वैभव असलेल्या महाराजांच्या स्मारकाबाबत प्रशासनाची उदासीनता आजवर दिसून आली आहे. या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आले नाहीत. स्मारकाची योग्य पद्धतीने देखरेख केली नसल्याने परिसरात घुशी आणि उंदरांचा वावर वाढत चालला आहे. या उद्यानातील फांद्यांची छाटणी वेळेवर होत नसल्याने त्या तुटून महाराजांच्या पुतळ्यावरही पडू शकतात.
>वस्तुसंग्रहालयही बांधणार
सुशोभीकरणामध्ये छत्रपतींचा जीवनपट उलगडणारी चित्रे, विद्युत रोषणाई, रायगड जिल्ह्याची प्रतिकृती, आबालवृद्धांसाठी वाचनालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदीचाही समावेश असेल.

Web Title: Soon after Shivaji Maharaj's statue of beautification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.