बोगस डॉक्टरांविरोधात लवकरच शोध मोहीम; आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल पालिकेच्या उपाययोजना
By वैभव गायकर | Published: October 18, 2023 04:18 PM2023-10-18T16:18:32+5:302023-10-18T16:18:45+5:30
खाजगी डॉक्टरांची पालिकेकडे नोंदणी असल्यास पालिका क्षेत्रातील डॉक्टरांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध होईल.
पनवेल:पनवेल महानगरपालिकेने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.यादृष्टीने पालिका क्षेत्रात 12 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र कार्यरत आहेत.तसेच पालिका हद्दीतील खाजगी डॉक्टरांची माहिती आपल्याकडे उपलब्ध असावी यादृष्टीने पालिकेने केलेल्या अवाहनाला खाजगी डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेकडून लवकरच विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
खाजगी डॉक्टरांची पालिकेकडे नोंदणी असल्यास पालिका क्षेत्रातील डॉक्टरांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध होईल. 2021- 22 मध्ये केलेल्या अवाहनाला प्रतिसाद मिळत नाही.केवळ 15 ते 20 डॉक्टरांनी पालिकेकडे नोंदणी केली आहे.वारंवार अवाहन करून देखील पालिकेच्या आरोग्य प्रशासनाला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी भरारी पथक स्थापन करून पालिका हद्दीतील खाजगी डॉक्टरांची तपासणी मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम लवकरच सुरु होणार आहे.या मोहिमेत डॉक्टरांची मान्यताप्राप्त मिडिकल कौन्सिल च डिग्री,मिळालेल्या डिग्रीच्या आधारावर रुग्णांचे उपचार होते का ?,प्रॅक्टिस करताना वैद्यकीय विभागाचे नॉर्म्स पाळले जातात का ? आदींसह वैद्यकीय विभागाच्या निगडित चौकशी पालिकेचे पथक करणार आहे.वाढत्या बाळ माता मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने तसेच डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रुग्णांची अद्ययावत माहिती पालिकेला उपलब्ध होण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी पुढाकार घेतला आहे.
शासनाच्या माता बाळ मृत्युदर कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अन्वेषक कमिटीच्या बैठकीत देखील याबाबत चर्चा करण्यात आली.पनवेल महानगरपालिका हद्दीत 600 ते 700 खाजगी डॉक्टर प्रॅक्टिस करतात.मात्र यापैकी केवळ 15 ते 20 डॉक्टरांनीच पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी केली आहे.याकरिता परिपत्रक काढुन देखील खाजगी डॉक्टर पालिका प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसुन येत आहे.
औषधोपचार होत आहे.रात्रीच्या वेळेला आपला दवाखाना देखील कार्यान्वित करण्यात आला आहे.असे असताना तळोजा एमआयडीसी सारख्या ठिकाणी अशिक्षित मजूर वर्गाचा फायदा घेत काही खाजगी डॉक्टर या रुग्णांवर उपचार करतात.सहज डॉक्टर उपलब्ध होत असल्याने मजूरवर्ग तसेच गरीब रुग्ण या डॉक्टरांकडे धाव घेतात.या डॉक्टराकडे वैद्यकीय डिग्री आहे का अशा डॉक्टारांचा देखील पालिका शोध घेणार आहे.
700 डॉक्टरांपैकी 20 जणांची नोंदणी -
पालिका हद्दीत जवळपास 700 खाजगी डॉक्टर वेगवेगळ्या शहरात,ग्रामीण भागात तसेच एमआयडीसी परिसरात प्रॅक्टिस करत आहेत.या डॉक्टरांकडून शेकडो रुग्णांची तपासणी नियमित केली जाते.यामध्ये डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रुग्णांचा समावेश आहे.मात्र हि माहिती पालिका प्रशासनाला उपलब्ध होत नाही.
सर्व खाजगी डॉक्टरांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे स्वतःची डिग्री आणि क्लिनिकची माहिती लवकरात लवकर पालिकेकडे द्यावी.जेणे करुन माता बाळ मृत्यू ,साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यास पालिकेला मदत होईल.
- डॉ आनंद गोसावी (मुख्य वैद्यकीय अधिकारी,पनवेल महानगरपालिका )