शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

एसपी सिंगलाचे रेवस-करंजा पुलाचे कंत्राटही वादाच्या भोवऱ्यात

By नारायण जाधव | Published: June 26, 2023 3:43 PM

धरमतर खाडीत २.४ किमीचा आहे पूल : ७९८ कोटींचे आहे काम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणाऱ्या रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणारा सागरी पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण या पुलाचे बांधकामाचे कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बहुचर्चित एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला दिले आहे. ही कंपनी बांधत असलेला बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवरील पूल काम पूर्ण होण्याआधीच कोसळला आहे. यामुळे या कंपनीच्या राज्यातील सर्व कामांची चौकशीची मागणी होत आहे. त्यात या पुलाच्या कंत्राटाचाही समावेश आहे.

एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलुंड उन्नत मार्ग, गोरेगाव हा ६ पदरी उड्डाणपुलाचे ६ अब्ज ६६ कोटी ६ लाख ७८ हजार इतक्या रकमेचे हे कंत्राट दिले आहे. मात्र, गंगा नदीवरील पूल कोसळल्यानंतर या दुर्घनटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकून दक्षता समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना दिले आहे. याच कंपनीला रस्ते विकास महामंडळाने धरमतर खाडीवरील रेवस - कारंजा दरम्यानच्या २.०४ किमी लांबीचा पूल बांधण्याचे ७९७ कोटी ७७ लाखांचे कंत्राट दिले आहे.

१०० कोटी कमी दराने घेतले कामया पुलाच्या बांधकामासाठी एकूण सहा कंपन्या इच्छुक हाेत्या. त्यातील ११.१३ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या एस.पी. सिंगलाचे कंत्राट मंजूर केले आहे. या कंत्राटाची मूळ किंमत ८९७ कोटी ६८ लाख इतकी असून त्यापेक्षा एस.पी. सिंगलाने १०० कोटी कमी दराने ते घेतल्याने त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

हे होते स्पर्धक सहा कंत्राटदारएसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्स (एसपीएससीएल) ७९७.७७ कोटीलार्सन अँड टुब्रो ८७३.१० कोटीजे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स ८८८.०० कोटीरेल विकास निगम लिमिटेड ९२२.५० कोटीॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ११०२.५० कोटीअशोका बिल्डकॉन १२८९.७० कोटीदोन्ही पुलांमध्ये हे साम्यबिहारच्या भागलपूर येथे गंगा नदीवरील निर्माणाधीन ४०० मीटर पूल कोसळला आहे. बिहारमधील पूल गंगा नदीवर बांधण्यात येत होता. तर रेवस-करंजा पूल खाडीवर बांधण्यात येत आहे. दोन्ही पूल पाण्यात बांधण्यात येत आहेत, हे यातील प्रमुख साम्य आहे.

बिहारमध्ये गुन्हा दाखलगंगा नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच पूल कोसळल्याने त्याच्या बांधकाम दर्जाविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या दुर्घटनेनंतर बिहार सरकारने एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बिहारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंपनीविरोधातील चौकशी पूर्ण होईपर्यंत रेवस-करंजाच्या कामास स्थगिती द्यावी, किंवा कंत्राट रद्द करून नव्याने निविदा मागवाव्यात, अशी मागणी होत आहे.