फिफा सामन्यांदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष,आठ प्रसानगृहांची उभारणी : प्रीफॅब्रिकेटेड आॅटोमाईज्ड टॉयलेट्सचा पहिला प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:38 AM2017-10-10T02:38:10+5:302017-10-10T02:38:15+5:30
डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. स्टेडियम परिसरामध्ये महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने ८ अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारली आहेत.
नवी मुंबई : डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. स्टेडियम परिसरामध्ये महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने ८ अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारली आहेत.
फिफाचे सर्व सामने निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महापालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. रस्ते दुरूस्तीसह सुशोभीकरणापर्यंत सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण केली आहेत. स्टेडियमच्या बाहेर ८ अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारली आहेत. उपआयुक्त तुषार पवार व कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांनी वसईमधील एन्व्हायरोन्मेंट मॅन्युफॅक्चुरर बोरकर पॉलिमर्ससोबत करून करार करून प्रीफॅब्रिकेटेड आॅटोमाईज्ड टॉयलेट्स तयार केले आहेत. ही प्रीफॅब्रिकेटेड युनिट्स पोर्टेबल असल्यामुळे त्यांचा विविध ठिकाणी गरजेप्रमाणे वापर करणे शक्य असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य बोरकर व तेजश्री बोरकर यांनी दिली आहे.
महापालिकेने पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयोग केला आहे. भविष्यात महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी अशाप्रकारची प्रसाधनगृहे उभारणे शक्य होणार आहे.