शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विशेष मुलांनी साकारल्या ‘डिझायनर’ राख्या

By admin | Published: August 08, 2015 10:12 PM

हातात कौशल्य आणि मनातला आत्मविश्वास या दोघांची सांगड घालून जगण्याच्या लढाईत कुठेही कमी पडणार नाही, हेच सीबीडीतील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या

- प्राची सोनवणे,  नवी मुंबईहातात कौशल्य आणि मनातला आत्मविश्वास या दोघांची सांगड घालून जगण्याच्या लढाईत कुठेही कमी पडणार नाही, हेच सीबीडीतील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. या विद्यार्थ्यांनी सुंदर, आकर्षक अशा ४० डिझाईन्सच्या ५०० राख्या तयार केल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पणत्या, कंदील, कागदी पिशव्या, दागिने अशा विविध वस्तू तयार केल्या आहेत आणि वस्तूंचे भव्य प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. शाळेतील फाल्गुनी व्होकेनशनल युनिटच्या वतीने या मुलांना वर्षभर विविध कलांचे प्रशिक्षण दिले जाते. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या राख्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. विविध शाळा, कॉलेज, कार्यालये, सामाजिक सांस्कृतिक संस्था, गृहनिर्माण संस्था, सोसायटींमध्ये या राख्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून विशेष हातांनी तयार केलेल्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मुलांनी एकदा काम हाती घेतले की त्यामध्ये ती एवढी मग्न होतात की त्यांना आजूबाजूच्या जगाचा विसरच पडतो. धागा ओवताना हातात सुई धरण्यापासून ते मणी ओवेपर्यंत संपूर्ण काम शिकविण्यासाठी शाळेच्या दहा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते. ५०० राख्या बनविण्यासाठी या ४० विद्यार्थ्यांच्या या संघाला ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागला. समाजामध्ये ही मुले कुठेही कमी पडता कामा नये, या हेतूने त्यांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबविले जातात. सणांचे महत्त्व, त्यामागचा हेतू याची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी दिली जाते.