जुहूगावात विशेष पथकाची धाड
By admin | Published: August 28, 2015 12:00 AM2015-08-28T00:00:06+5:302015-08-28T00:00:06+5:30
जुहूगावमधील वेश्याव्यवसाय चालविण्यात येणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली. वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येणाऱ्या तीन मुलींची
नवी मुंबई : जुहूगावमधील वेश्याव्यवसाय चालविण्यात येणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली. वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येणाऱ्या तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. हा अड्डा चालविणाऱ्या नझमा शेख या महिलेवर पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलिसांनी शहरातील अवैध व्यवसायांवर धाडसत्र सुरू केले आहे. पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी कोणत्याही स्थितीमध्ये शहरात जुगार अड्डे, मटका व इतर अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत असे आदेश सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय कारवाईसाठी विशेष पथकही नियुक्त केले आहे.
जुहूगावमधील एका घरामध्ये अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उपआयुक्त उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन बागडे, प्रदीप सरफरे व इतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सापळा रचला. बोगस ग्राहक पाठवून त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री करून धाड टाकली. तीन अविवाहित मुलींची सुटका करण्यात आली आहे. मूळची झारखंडमधील रहिवासी असलेली नझमा बारीक शेख ही महिला हा अड्डा चालवत होती.