विमानतळाच्या कामाला गती द्या! मुख्यमंत्र्यांचे निर्देश; नवी मुंबई विमानतळासंदर्भात तीन सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:36 AM2018-01-09T01:36:51+5:302018-01-09T01:37:02+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासंदर्भातील तीन सामंजस्य करार करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले.
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासंदर्भातील तीन सामंजस्य करार करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले.
देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्यात येणार आहे. जवळपास २,२२६ हेक्टर जागेवर हे विमानतळ उभारण्यात येणार आहे, तर वैमानिक क्षेत्राची जागा ११६० हेक्टर इतकी असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे १६,००० कोटींच्या घरात आहे. पहिल्या टप्प्याचे काम २०१९ सालापर्यंत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे. या नवी मुंबई विमानतळासाठी भागीदार कंपनी म्हणून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीबरोबर मिळून सिडको व इतर भागीदारांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड या विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीबरोबर सोमवारी सवलत करारनामा, राज्य शासनाच्या पाठिंब्याचा करार व भागधारकांचा करार आदी तीन महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. या वेळी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, मुख्य दक्षता अधिकारी विनय कोरगावकर, जीव्हीकेचे संजय रेड्डी, मुंबई विमानतळ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन आदी उपस्थित होते.
यांनी केल्या स्वाक्षºया!
सामंजस्य करावारवर सिडकोच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीच्या वतीने जीव्हीके कंपनीचे प्रमुख जीव्हीके रेड्डी यांनी करारावर स्वाक्षºया केल्या.