पनवेलमध्ये प्रचाराला वेग

By admin | Published: May 8, 2017 06:23 AM2017-05-08T06:23:32+5:302017-05-08T06:23:32+5:30

पनवेल महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमदेवारांची निवडणूक कार्यालयात

The speed of the campaign in Panvel | पनवेलमध्ये प्रचाराला वेग

पनवेलमध्ये प्रचाराला वेग

Next

वैभव गायकर/  लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमदेवारांची निवडणूक कार्यालयात अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकलेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी रविवार सुट्टीचा दिवस खऱ्या अर्थाने अधिकृत प्रचाराच्या शुभारंभाचा दिवस ठरला.
पनवेल महापालिकेत २0 प्रभागांतील ७८ जागांसाठी ६३६ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीची सुट्टी असल्याने उमेदवारांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. अनेक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन मतदानाचे आवाहन केले.
सर्वच राजकीय पक्षांनी पालिका निवडणुकीत पक्षाचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी पक्षाचे बॅनर्स मतदारांचे लक्ष आकर्षित करीत आहेत. मात्र, रविवार हा सुट्टीचा वार वैयक्तिक प्रचारावर भर दिला. खारघर पासून पनवेलपर्यंत विविध प्रभागातील मातब्बर उमेदवारांनी सकाळपासून मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला होता. सध्याच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा मोठा प्रभाव जाणवतो; परंतु मतदारांची प्रत्यक्ष भेट घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यानुसार अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी दिवसभर मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर दिला.
पनवेलमधील प्रभाग क्र मांक १८ हा सर्वांचे लक्ष लागून राहिलेला महत्त्वपूर्ण प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागातून शेकापने अतुल भोईर आणि माजी नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. या प्रभागात भाजपाचे विक्रांत पाटील, नितीन पाटील, भारती उरणकर आणि ज्योत्सना दुधे या उमेदवारांशी थेट लढत होणार आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांशी मतदार घरीच असतात. शिवाय प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आलेला हा पहिलाच रविवार असल्याने घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधल्याचे या प्रभागातील शेकापचे उमेदवार अतुल भोईर यांनी सांगितले. खारघर शहरातील प्रभाग क्रमांक ६मध्ये शेकाप आणि भाजपाच्या उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला.
महाआघाडीचे उमेदवार संतोष गायकर, अंजनी ठाकूर, अशोक गिरमकर, उषा आडसुळे यांच्या प्रचाराचा नारळ आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थित फोडण्यात आला. या प्रभागातून भाजपाचे उमेदवार नीलेश बाविस्कर, अ‍ॅड. नरेश ठाकूर, आरती नवघरे, संजना कदम यांनीदेखील सोसायटीमध्ये फिरून मतदारांशी संवाद साधला. प्रभाग क्रमांक १३मधून महाआघाडीच्या वतीने शीला भाऊ भगत यांनी सकाळपासूनच संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. एकूणच २0 या प्रभागात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही आपल्या पद्धतीने रविवारी सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून प्रचाराला सुरु वात केली. सायंकाळी उशिरापर्यंत हा प्रचार सुरू होता.

Web Title: The speed of the campaign in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.