शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

पनवेलमध्ये प्रचाराला वेग

By admin | Published: May 08, 2017 6:23 AM

पनवेल महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमदेवारांची निवडणूक कार्यालयात

वैभव गायकर/  लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमदेवारांची निवडणूक कार्यालयात अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकलेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी रविवार सुट्टीचा दिवस खऱ्या अर्थाने अधिकृत प्रचाराच्या शुभारंभाचा दिवस ठरला. पनवेल महापालिकेत २0 प्रभागांतील ७८ जागांसाठी ६३६ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीची सुट्टी असल्याने उमेदवारांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. अनेक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन मतदानाचे आवाहन केले. सर्वच राजकीय पक्षांनी पालिका निवडणुकीत पक्षाचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी पक्षाचे बॅनर्स मतदारांचे लक्ष आकर्षित करीत आहेत. मात्र, रविवार हा सुट्टीचा वार वैयक्तिक प्रचारावर भर दिला. खारघर पासून पनवेलपर्यंत विविध प्रभागातील मातब्बर उमेदवारांनी सकाळपासून मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला होता. सध्याच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा मोठा प्रभाव जाणवतो; परंतु मतदारांची प्रत्यक्ष भेट घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यानुसार अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी दिवसभर मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर दिला. पनवेलमधील प्रभाग क्र मांक १८ हा सर्वांचे लक्ष लागून राहिलेला महत्त्वपूर्ण प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागातून शेकापने अतुल भोईर आणि माजी नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. या प्रभागात भाजपाचे विक्रांत पाटील, नितीन पाटील, भारती उरणकर आणि ज्योत्सना दुधे या उमेदवारांशी थेट लढत होणार आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांशी मतदार घरीच असतात. शिवाय प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आलेला हा पहिलाच रविवार असल्याने घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधल्याचे या प्रभागातील शेकापचे उमेदवार अतुल भोईर यांनी सांगितले. खारघर शहरातील प्रभाग क्रमांक ६मध्ये शेकाप आणि भाजपाच्या उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. महाआघाडीचे उमेदवार संतोष गायकर, अंजनी ठाकूर, अशोक गिरमकर, उषा आडसुळे यांच्या प्रचाराचा नारळ आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थित फोडण्यात आला. या प्रभागातून भाजपाचे उमेदवार नीलेश बाविस्कर, अ‍ॅड. नरेश ठाकूर, आरती नवघरे, संजना कदम यांनीदेखील सोसायटीमध्ये फिरून मतदारांशी संवाद साधला. प्रभाग क्रमांक १३मधून महाआघाडीच्या वतीने शीला भाऊ भगत यांनी सकाळपासूनच संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. एकूणच २0 या प्रभागात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही आपल्या पद्धतीने रविवारी सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून प्रचाराला सुरु वात केली. सायंकाळी उशिरापर्यंत हा प्रचार सुरू होता.