शहरात सुविधा कामांना गती, आयुक्तांचा पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:07 AM2019-06-12T02:07:31+5:302019-06-12T02:07:52+5:30

आयुक्तांचा पाहणी दौरा : प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

Speed of facilities in the city, inspector visits visit | शहरात सुविधा कामांना गती, आयुक्तांचा पाहणी दौरा

शहरात सुविधा कामांना गती, आयुक्तांचा पाहणी दौरा

Next

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे येथील सेक्टर १४ व १६ परिसरातील कंडोमिनियमअंतर्गत असलेल्या मलनि:सारण वाहिन्या, अडवली भूतवली गाव, श्रमिक नगर खैरणे येथे पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पाहणी केली. तेथील नागरिकांच्या आवश्यकतेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने कामाचे महत्त्व लक्षात घेऊन याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शहरातील कंडोमिनियम भागात असलेल्या जलवाहिन्या व मलनि:सारण वाहिन्या या ३0 वर्षांपूर्वीच्या असून निकामी झाल्याने त्यांची कामे महापालिकेमार्फत करण्याची मागणी लोकप्रतिनिधींद्वारे वारंवार करण्यात येते. याबाबत डिसेंबर २0१८ रोजी महापालिकेमार्फत कंडोमिनियमअंतर्गत कामे करण्यास शासनाने मंजुरीही दिली आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी कोपरखैरणे येथील सेक्टर १४ व १६ परिसरातील कंडोमिनियमअंतर्गत असलेल्या मलनि:सारण वाहिन्यांच्या सद्यस्थितीची पाहणी केली.
शहराचा सर्वांगीण विकास होत असताना अडवली भूतवली गावातील आदिवासी नागरिकांचे राहणीमान उंचाविण्यासाठी येथील २२ आदिवासी कुटुंबीयांच्या कच्च्या घरांच्या जागी ३५0 चौरस फुटाची पक्की घरे बांधून देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याबाबत आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे येथील महापालिकेच्या शाळेचा वाढता पट लक्षात घेऊन त्याठिकाणी दोन मजली शाळा इमारतीवर आणखी एक मजला वाढविण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी अभियांत्रिकी विभागाला दिल्या.
वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेअंतर्गत श्रमिक नगर खैरणे येथे बांधलेल्या घरांची पाहणी करून त्याठिकाणी आवश्यक दुरु स्ती सूचित केले तसेच त्याठिकाणी बांधण्यात येत असलेल्या शाळा इमारत बांधकामाची पाहणी करून कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. महापालिकेमार्फत सुविधा पुरविताना त्याची आवश्यकता लक्षात घेऊन प्राधान्याने कामे मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आयुक्तांसमवेत शहर अभियंता सुरेंद्र पाटील, उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, कार्यकारी अभियंता संजय देसाई, कोपरखैरणे विभागाचे सहायक आयुक्त अशोक मढवी व इतर अधिकारी तसेच नगरसेवक देविदास हांडेपाटील, रमेश डोळे उपस्थित होते.

मोटरने पाणी खेचणाऱ्यांवर कारवाई
च्कोपरखैरणे भागातील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा व्हावा यासाठी मोटार लावून पाणी खेचून घेत असलेल्या ठिकाणांची तपासणी करून कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title: Speed of facilities in the city, inspector visits visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.